सोलर पंपासाठी लॉटरी लागली? मग असा मिळवा सोलर पंप..
Lottery for solar pumps? Then get a solar pump like this -
महाडीबीटवर लॉटरी(MAHA DBT) लागलेल्या सोलर पंपाच्या अनुदानासाठी अर्ज भरले जात आहेत. लॉटरी लागल्यानंतर कुठली कागदपत्रे उपलोड करायची? कागदपत्रे उपलोड केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय आहे? पंम्प कोणाला मिळणार आहे? किंवा अनुदान कोणाला मिळणार आहे? हि सारे त्या ठिकाणी प्रश्न येत आहेत आणि बरेच सारे लाभार्थी ज्यांची या पंपासाठी लॉटरी लागलेली आहे, ते पंचायत समिती महावितरण कार्यालय अशा ठिकाणी ये जा करून वेळ पैसे व्यर्थ खर्च करत असताना दिसत आहेत.
वाचा : बँक बुडाली तर आपल्या कष्टाच्या पैश्याचे काय होणार? मोदी सरकारने घेतला हा निर्णय..
आता पैसे व्यर्थ न करता तुम्ही ऑनलाइन (ONLINE)अर्ज करू शकता पण महाडीबीटी च्या माध्यमातून तुम्ही सोलर पंपासाठी (solar pump) जे काही पैसे भरले आहेत त्या भरण्यानुसार तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. यानंतर लावलेल्या पंपानुसार तुम्हाला अनुदान (subsidy) मिळणार आहे. ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांना मिळणार नाही. आता ज्यांच्या शेतामध्ये पंप लागलेला आहे आणि ज्यांनी या सोलर पंपासाठी महाडीबीटीवर अर्ज केलेला आहे. त्यांची जर लॉटरी (lottery) लागली असेल तर ७ /१२ आठ हि कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यानंतर सोलर पंप मिळून जाईल.
महाडीबीटीला जो आधार कार्ड (adhaar card) दिलेला आहे तोच आधार कार्ड वापरून अर्ज केला तरच सोलर पंपाची अनुदान मिळेल हे लक्षात ठेवा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :