इतर
ट्रेंडिंग

मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान..

Lost mobile? Do 'this' work otherwise it will be a big loss ..

अलीकडच्या काळामध्ये मोबाईल (Mobile) हा एक जीवनावश्यक घटक बनला आहे, सध्याच्या काळामध्ये सगळ्यांकडेच मोबाईल फोन आहे. मोबाईल फोनचे जसे अनेक फायदे आहेत, तितकेच धोके मोठ्या प्रमाणात आहेत. बरेच वेळा आपल्या मोबाईल मध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, (Documents) फोटोज, बँकेशी संबंधित महत्त्वाची माहिती (Important information related to the bank) असल्यास मोबाईल गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास अनिष्ट परिणाम घडू शकतात.

फोन चोरीला (Stolen) गेला किंवा हरवला (Lost) तर तो ब्लॉक (Block) कसा करायचा ते आपण जाणून घेऊयात. (how-to-block-a-lost-or-stolen-mobile-find-out) मोबाईल चोरीला गेला किंवा गहाळ झाल्यास प्रथम जीपीएस लोकेशन, (GPS location) सीम कार्ड आणि इंटरनेट (Internet) यांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

[metaslider id=4085 cssclass=””]

हेही वाचा : तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…

फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्ही घरी बसून आयएमईआय क्रमांकाच्या (IMEI numbered) माध्यमातून तो ब्लॉक करु शकता. तसंच तो सध्या कोणत्या लोकेशनला आहे हेदेखील ट्रॅक करु शकता. मोबाईल गहाळ झाला असेल किंवा चोरीला गेला असेल तर पोलिस स्टेशनमध्ये (At the police station) तक्रार नोंदवा, जेणेकरून चोराने किंवा तिऱ्हाईत व्यक्तीने त्याचा गैरवापर करून करू नये यासाठी मोबाईल ब्लॉक करने गरजेचे आहे.

मोबाईल अशा रीतीने करा ब्लॉक…
प्रथम Central Equipment Identity Register (CEIR) या संकेतस्थळावर जा. त्यानंतर https://ceir.gov.in/Home/index.jsp या लिंकवर क्लिक करून लॉगइन करा. त्यानंतर CEIR पोर्टलवर हरवलेल्या फोनचा IMEI नंबर टाईप करा व CEIR सर्व्हिसेसमध्ये (In services) हरवलेल्या मोबाईलला ब्लॉक करण्याच्या ऑप्शनची निवड करा. हा ऑप्शन (Option) निवडल्यानंतर तेथे फोनसंबंधित विचारल्या गेलेल्या प्रश्नांची नीट माहिती भरा. तसंच या पर्यायामध्ये हरवलेल्या फोनविषयी, सिम कार्ड, पोलिसांत तक्रार केली असेल तर त्याबाबत माहिती देऊन रिक्वेस्ट सबमिट(Request submitted) करा.

हेही वाचा : ‘फेसबुकचे स्मार्टवॉच’ पाहिले आहे का? जाणून घ्या काय आहेत ‘या’ स्मार्टवॉच चे फीचर्स…

IMEI नंबर असा माहित होईल.. हरवलेल्या मोबाईलचा IMEI नंबर तुम्हाला फोनच्या बीलवर किंवा मोबाईलच्या बॉक्सवर सापडेल. हा नंबर १५ अंकी असतो. या नंबरच्या आधारे तुम्ही फोन ब्लॉक करु शकता.

हेही वाचा :

1. स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…

2. जनावरांमध्ये आढळणारा,’लाळ्या खुरकुताचा रोगाचा’ प्रभाव झाला आहे हे कसे ओळखाल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button