नगरच्या कृषी उत्पन्न समिती मध्ये मिरचीच्या दराचा ठसका पहा : लाल मिरची ,लवांगी मिरची, बेडगी मिरचीला किती आलाय दराला रंग…
Look at the price of chillies in the Agricultural Produce Committee of the town: red chilli, clove chilli, bedgi chilli.
येत्या काही दिवसात मिरचीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नगरच्या कृषी उत्पन्न समिती मध्ये गेल्या दोन महिन्यापासून मिरचीला चांगलाच भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे . मागच्या आठवड्यामध्ये मिरचीचा भाव साधारणपणे वीस हजार प्रति क्विंटल दराने मिळाला होता.
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर दिसून आली आत्तापर्यंत सर्वात जास्त मिरचीचा दर एकवीस हजार प्रति क्विंटल मिळाला तर सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल येथे मिळालेल्या दिसला
यामध्ये औरंगाबाद बीड जालना विदर्भ खानदेश बुलढाणा येथून मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात आलेली दिसत आहे.
मसाले करण्याकरता वापरात येणारी बेडगी मिरची दराचा रंग देखील अजून पर्यंत टिकून आहे. सर्वसाधारणपणे बेडगी मिरची ला 15000 ते वीस हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.नगर मध्ये मिरचीला यंदा सर्वाधिक भाव मिळत आहे,
नगर मधून लाल मिरची पुणे मुंबई तसेच काही परराज्यात देखील जात असते.