
पारंपरिक शेती (Traditional farming) पावसावर अवलंबून असून त्याकरता उन्हाळ्यामध्ये शेतीची मशागत करून घेणे आवश्यक असते, याचा फायदा खरीप हंगामात होतो बळीराजा व त्याचे कुटुंब व त्याचे पालन पोषण खरीप हंगामाच्या वर बरेचसे अवलंबून असते, परंतु या वेळी लॉकडाऊन (Lockdown) असल्याकारणाने मशागतीच्या ( Cultivation) कामात अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती बरेच शेतकरी बांधवांना सतवत आहे, कोरोनामुळे (Corona) ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ( Economy) मोठ्या प्रमाणावर कोलमडून गेली आहे.
अनेक पिके पावसाच्या पाण्यावर आधारित असतात, त्याकरता जून महिना लागण्याच्या आत शेतीची मशागत करणे अत्यावश्यक असते, त्यातच पावसाचा नियम नसल्याकारणाने पावसाळा सुरू होण्याच्या आधी आर्थिक फटका (Economic shot) बसण्याची शक्यता आहे. कापूस सोयाबीन,बाजरी, ज्वारी, मका व इतर पिके या हंगामात घेतली जातात, हे पीक घेण्यापूर्वी चांगल्याप्रकारे शेतीची मशागत करणे अत्यावश्यक असते.
8 जून पासून खरीप हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे ग्रामीण विभाग या हंगामावर बरेचसे त्यांचे आर्थिक नियोजन अवलंबून असते 8 जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात होत असल्याकारणाने पेरणीची कामे वेळेत करणे आवश्यक आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योगधंदे ठप्प ( Businesses stalled) झाले असून शेती करता लागणारी दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना साधने वेळेवर विकत घेता येत नाही.
- करा ही कामे: सध्या वातावरणात बरेचसे बदल होत असून सकाळी कडकडीत ऊन पडल्यानंतर दुपारच्या पुढे ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे, सध्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सातत्याने होणारे आगमन शेती करता हानिकारक आहे बऱ्याच ठिकाणी या पावसाचा फटका बसत आहे, नुकतेच हवामान खात्याकडून गारपीटसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, होणारे नुकसान टाळण्याकरिता वेळेतच ही कामे आटपून घ्या: *पावसाची शक्यता लक्षात घेऊन कांदा पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
- जाणून घ्या: डाळिंब फळबाग लागवडमाहिती, वापरण्यात येणारी खते, डाळिंबाचे प्रकार, हवामान याची संपूर्ण माहिती…
- नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा *फळबागांना आच्छादनाचा वापर करावा, नवीन लागवड करावयाच्या फळबागांसाठी खड्डे तयार करावेत
हे ही वाचा:
1)भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!
2) कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…