महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यामधील लॉकडाऊन उठविला… पहा कोणत्या जिल्ह्यात काय चालू होणार?
Lockdown lifted in 18 districts of Maharashtra… See what will happen in which district?
MAHARASHTRA LOCKDOWN: महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असून, सरकारने आता अनलॉक (Unlock) करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये (In 5 stages) लॉक डाउन कमी करण्याचे ठरवले आहे. राज्यात अनलॉक करण्यासाठी दोन गोष्टी सरकारने लक्षात घेतलेले आहेत त्या म्हणजे त्या जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची उपलब्धता.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे
थोडासा दिलासा! कृषी निगडीत दुकाने ‘या’ वेळेत सुरु राहणार…
ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजनची उपलब्धता अनुकूल (Districts where positivity is less than 5% and oxygen availability is favorable) असेल या ठिकाणचा लॉक डाऊन उठविण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व गोष्टी सुरळीत चालू होतील अशी माहिती राज्याचे माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (State Information Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांनी दिली.
राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. या जिल्ह्यामध्ये ठाणे ,औरंगाबाद, लातूर , जालना , नांदेड , परभणी , बुलढाणा, नाशिक, जळगाव, नागपूर , भंडारा , वर्धा, गोंदिया, वाशीम, यवतमाळ , चंद्रपुर, गडचिरोली, धुळे यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामधील सर्व निर्बंध हे हटवण्यात येणार आहेत म्हणजेच या जिल्ह्यामध्ये सर्व दुकाने व व्यवसाय चालू राहतील. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. आठवड्याच्या दर शुक्रवारी जिल्हा अधिकारी आढावा बैठक घेणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये खालील गोष्टी सुरळीतपणे चालू राहतील. खाजगी कार्यालय 100% चालू राहतील. रेस्टॉरंट्स, मॉल्स, मॉर्निंग वॉक , ट्रेकिंग, थेटर सुरू होतील. शूटिंग साठी परवानगी राहील. सार्वजनिक कार्यक्रम व लग्नसोहळ्यासाठी शंभर टक्के सूट देण्यात आली आहे. जिम, सलून, ई-कॉमर्स चालू राहतील. आंतरजिल्हा प्रवास सुरू राहणार आहे. इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध असणार आहेत.
हेही वाचा :
1)शेतातलं पिवळं सोनं बहरलं: “सोयाबीनला” मिळतोय 7400 रुपयांचा दर!
2)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…