कृषी बातम्यायोजना

Subsidy | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर

भारत हा कृषिप्रधान देश असून, भारतातील जवळपास 65 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह शेती (Agriculture) व्यवसाय चालतो. मात्र, शेतकऱ्यांना शेती करताना देखील विविध अडचणी समस्या उद्भवत असतात.

Subsidy | त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचा (Natural disaster) देखील सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अचानक अतिवृष्टी (Excessive rain damage) झाल्याने शेतकऱ्यांची पिके (crop) भुईसपाट होतात. याच झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाद्वारे अनुदान मिळते. आता अतिवृष्टी नुकसान भरपाई 2019 च्या वाटप झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यास सुरुवात झाली आहे.

नुकसान भरपाईसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी
2021 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी यापूर्वीच जुलै 2019 ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे शासन निर्णय घेऊन या ठिकाणी मदतीचे वाटप केलं होतं. त्यासाठी 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीसाठी 75 टक्के नुकसान भरपाईसाठी 28 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. त्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 टक्के रक्कम वितरीत करण्यासाठी 1 हजार 35 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. याच वाटपाची रक्कम शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी आता जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करायला सुरुवात झालेली आहे.

वाचा: Agriculture | शेतकऱ्यांना फटका! पीक कर्जावरील 2 टक्के व्याज परतावा अनुदान बंद, जिल्हा बँकांनाही…

‘या’ संकेतस्थळावर पाहा यादी
उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप झालेल्या 25 टक्के जी रक्कम आहे. त्या लाभार्थ्यांची यादी उस्मानाबाद जिल्ह्याच्या osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात झाली आहे. यासाठी तुम्हाला सूचनाच्या अंतर्गत घोषणावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुक्यांची माहिती तुम्हाला मिळेल.

वाचा: Tomato Farming | टोमॅटोची शेतीतून मिळवा बक्कळ नफा, ‘या’ जातींची निवड करून करा ‘अशा’पद्धतीने व्यवस्थापन

परांडा तालुक्यामध्ये 25 टक्के नुकसान भरपाईचे ही दुसरी यादी आली आहे. त्याचबरोबर परंडा तालुक्यातील पहिल्या टप्प्याची 75% यादी देखील आली आहे. भूम तालुक्याची 100% ची यादी आहे. उमरगा तालुक्याचे पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% ची सुद्धा यादी आली आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तालुक्याचे याठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे तुम्ही इतर जिल्ह्यातील या देखील पाहू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button