Technology : टेलिग्रामचे ढासू फीचर्स! एकाच वेळी 30 जणांशी व्हिडिओ कॉल वर बोलता येणार…
Ligram's sleek features! Talk to up to 30 people at once on video call
टेलिग्राम (Telegram) मध्ये सतत काही ना काही नवीन बदल पाहण्यास मिळत आहेत, टेलिग्राम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फिचर्स (Features) लॉंच केले आहे. ज्यामध्ये ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स (Video conferencing) कॉलमध्ये रूपांतरित करू शकतात. टेलिग्रामच्या iOS, Android आणि डेस्कटॉप अॅप्सच्या (Of desktop apps) लेटेस्ट व्हर्जन्समध्ये युजर्स हे फीचर वापरू शकतात.
टेलिग्राम च्या नवीन फीचर्स मध्ये एकाच वेळेस 30 जणांशी व्हिडीओ कॉलवर (On video call) बोलता येणार आहे. आणि काही काळानंतर हे लिमिट वाढवण्याची देखील शक्यता कंपनीकडून सांगण्यात येत आहे.त्याचप्रमाणे लाईव्ह इव्हेंट्स (Live events) आणि इतर नवीन फीचर्स सपोर्ट करण्यासाठी व्हॉईस चॅटचा विस्तार केला जात आहे. युजर्स फोनवर, तसेच टॅब्लेट आणि कम्प्युटरवरुन (From the computer) ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये भाग घेऊ शकतात, अशी माहिती टेलिग्राम च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
WhatsApp वरील चॅट्स Telegram कसे मूव्ह कराल?
टेलिग्रामच्या नवीन फीचर्स नुसार, WhatsApp चॅट्स Telegram वर मूव्ह करु शकता. Telegram काही महिन्यांपूर्वी नवं फिचर रोलआऊट केलं आहे, जे सध्या अँड्रॉयडवर (On Android) उपलब्ध आहे. या फिचरच्या मदतीने WhatsApp युजर्स त्यांचे चॅट्स आणि मल्टीमीडिया फाईल्स आरामात टेलिग्रामवर शिफ्ट करु शकतात. हे चॅट एक्सपोर्ट फिचर आयफोन युजर्ससाठी (For iPhone users) देखील रोलाऊट करण्यात आलं आहे. या व्हाट्सअप ॲपमध्ये गेल्यानंतर कोपऱ्यात इन डॉट दिसतील, तिथे क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, तिथे असलेल्या मोर ऑप्शन वर क्लिक करा. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर शेअर मेनू ओपन होईल. त्यामध्ये टेलिग्रामची निवड करा.
हेही वाचा:
1. सोयाबीनला मिळाला उच्चांकी दर! सोयाबीन उत्पादकांना येणार का ‘अच्छे दिन’
2. LPG Subsidy: एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होते का? नाहीतर’ येथे’ करा तक्रार…