LIC New Scheme | वाढत्या खर्चावर शर्थी उपाय! LIC चे ‘झिरो जॉइनिंग फी’ आणि ‘फ्री 5 लाख इन्शुरन्स’ असलेली क्रेडिट कार्ड्स लाँच…
LIC New Scheme | Conditional solutions to rising costs! LIC Launches Credit Cards With 'Zero Joining Fee' And 'Free 5 Lakh Insurance'…
LIC New Scheme | एलआयसी कार्ड्स, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि मास्टरकार्ड, यांनी संयुक्त विद्यमाने दोन क्रेडिट कार्ड्स लॉन्च केले आहेत. (LIC New Scheme) एलआयसी क्लासिक आणि एलआयसी सिलेक्ट, अशी या दोन्ही कार्ड्सची नावे आहेत.
या दोन्ही कार्ड्समध्ये कमी व्याजदर, झिरो जॉयनिंग फी, रिवॉर्ड पॉइंट्स आणि वैयक्तिक अपघाती विमा यासारखे अनेक फायदे आणि ऑफर मिळत आहेत.
एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्डचे फायदे
- कोणतेही जॉयनिंग चार्ज किंवा वार्षिक शुल्क नाही.
- व्याज दर दरमहा 0.75 टक्के किंवा 9 टक्के प्रतिवर्षापासून सुरू होतात.
- 30 दिवसांत किमान एक व्यवहार केल्यावर 5,00,000 रुपयांचे वैयक्तिक अपघाती कव्हर.
- कार्ड हरवल्यावर 50,000 रुपयांचे लायबिलीटी कव्हर.
एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्डचे फायदे
- कोणतेही जॉयनिंग आणि वार्षिक शुल्क नाही.
- व्याज दर दरमहा 0.75 टक्के किंवा 9 टक्के प्रतिवर्षापासून सुरू होतात.
- 48 दिवसांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एटीएमवर कोणतेही व्याज नाही.
- 30 दिवसांत किमान एक व्यवहार केल्यावर 5,00,000 रुपयांचे वैयक्तिक अपघाती कव्हर.
- कार्ड हरवल्यावर 50,000 रुपयांचे लायबिलीटी कव्हर.
- परचेस प्रोटेक्शन कव्हर, क्रेडिट शिल्ड आणि प्रवास विमा संरक्षण.
वाचा : LIC New Jeevan Shanti Yojana | एलआयसीच्या ‘नवीन जीवन शांती योजने’त फक्त एकदा जमा करा ‘इतकी’ रक्कम अन् आयुष्यभर मिळवा 50 हजार पेन्शन
एलआयसी क्रेडिट कार्ड विमा फायदे
- 30 दिवसांत किमान एक व्यवहार केल्यावर 5,00,000 रुपयांचे वैयक्तिक अपघाती कव्हर.
- कार्ड हरवल्यावर 50,000 रुपयांचे लायबिलीटी कव्हर.
- परचेस प्रोटेक्शन कव्हर.
- क्रेडिट शिल्ड.
- प्रवास विमा संरक्षण (बॅगेज हरवणे किंवा उशीर होणे, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवणे आणि उड्डाणाला होणारा विलंब).
- एक कोटी रुपयांचा हवाई अपघात विमा.
एलआयसीचे हे दोन्ही क्रेडिट कार्ड्स LIC पॉलिसीधारकांसाठी तसेच LIC पॉलिसी नसल्यासही सर्वांसाठी उपलब्ध आहेत. या कार्ड्ससाठी तुम्ही LIC वेबसाइट, LIC कार्ड्सच्या अधिकृत वेबसाइट किंवा आयडीएफसी फर्स्ट बँकच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता.
एलआयसीचे हे क्रेडिट कार्ड्स देशभरातील 14 लाखांहून अधिक एटीएम आणि 30 लाखांहून अधिक व्यापारी ठिकाणी स्वीकारले जातात.
Web Title : LIC New Scheme | Conditional solutions to rising costs! LIC Launches Credit Cards With ‘Zero Joining Fee’ And ‘Free 5 Lakh Insurance’…
हेही वाचा