ऊस दर वाढीचे पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पाठवले पत्र; पहा काय आहे पत्रात..
Letters sent to the Chief Minister and the Minister of Agriculture, including the Prime Minister, regarding the increase in sugarcane prices; See what's in the letter.
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांना उसाचे चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. ऊसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीबाबत सच या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांचे लक्ष निर्णयाकडे लागून राहिले आहे.
२०१७-१८ मध्ये सरकारने उसाच्या दरात फक्त १० रुपयांची वाढ केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दिसत आहे. गेल्या चार वर्षात दरवाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याममध्ये फायदा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
डिझेलचे दर ५० टक्क्यांनी, मजुरी २५ टक्के आणि विजेचा वार्षिक खर्च ६,००० रुपयांनी वाढला आहे. किटकनाशकांची दरवाढ झालेली नाही. मात्र उसाचे वजन घटत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली दिसून येत आहे. उसाच्या दराकडे आशेने शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं दिसून येतं.
वाचा : उस उत्पादकासाठी फायदेशीर असणारी “ही” उसाची जात माहीत आहे का ? पहा उत्पन्न, फायदे व वैशिष्ट्ये..
वाचा : केंद्राचा ऊस उत्पादसाठी मोठा निर्णय: 70 लाख मेट्रिक टन साखर च्या अनुदान सहित दोन मोठे निर्णय..
सच संस्थेने शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहून सरकारला पत्र पाठवले आहे.साखरेच्या रिकव्हरीतही सव्वा टक्के वाढ झाली आहे. आकडेवारी मांडताना सच संस्थेचे अध्यक्ष म्हणाले की शेतकऱ्यांचे सुमारे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे. सरकारने तातडीने स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यासह उसाचा दर प्रती क्विंटल ४५० रुपये करण्याची गरज आहे. शेतकर्यांनासाठी ऊस दर अत्यंत महत्वाचं समजून मागणी केली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :