कृषी बातम्या

आरोग्यदायी द्राक्षाचे गोडसर फायदे चला तर पाहुयात आरोग्यदायी द्राक्षाचे फायदे…

Let's look at the sweet benefits of healthy grapes and see the benefits of healthy grapes

द्राक्ष हे कमी वेळ टिकणारे फळ आहे सर्वसाधारणपणे काढणीनंतर पाच ते सहा दिवसांपर्यंत ती चांगली राहू शकतात. द्राक्ष वाईन बनवण्यासाठी उपयुक्त असते परंतु काही देशांमध्ये ताजी द्राक्ष खाण्यासाठी देखील वापरली जातात काढणीनंतर द्राक्ष लगेच विकणे गरजेचे असते कारण द्राक्ष नाशवंत पदार्थ असल्यामुळे ते लगेच खराब होऊन जातात त्यामुळे त्याला चांगला दरही मिळत नाही द्राक्ष पासून अनेक अनेक गोष्टी तयार केल्या जातात जसे की द्राक्षाचा रस, सरबत,जेली लोणच, मुरंबा, बेदाणा, मनुका इत्यादी पदार्थ तयार केले जातात द्राक्षाचे अनेक फायदे आहेत चला तर पाहुयात द्राक्षाचे फायदे

🍇 द्राक्षामध्ये सी, के आणि ए हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते.

🍇 द्राक्ष मधील ग्लुकोज रक्तात सहज विरघळले जाते त्यामुळे थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते

🍇ज्यांना हृदययाचा त्रास आहे त्यांच्यासाठी द्राक्ष अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते

🍇द्राक्ष पासून तयार होणारी वाइन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते

🍇 काळे द्राक्ष मध्ये जीवनसत्व क, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन सारखे ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात.

🍇 टीबी, कॅन्सर आणि रक्ताच्या संसर्गावर द्राक्ष गुणकारी असते.

🍇द्राक्ष मुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते तसेच काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे पोट साफ होण्यास देखील मदत होते.

🍇द्राक्षांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते शरीरात रक्त कमी असल्यास एक दिवस द्राक्षाचा रसामध्ये दोन चमचे मध घालून पिल्यास उपयुक्त ठरते.

🍇द्राक्ष सेवनाने त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

चला तर मग या उन्हाळ्यात आपण हि भरपूर द्राक्षाचा खाण्याचा आनंद घेऊयात.

अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती, तंत्रज्ञान, यशोगाथा, बातम्यांसाठी वाचत रहा मी E शेतकरी अशी उपयुक्त माहिती शेतकरी मित्रांकडे पोहोचवा
https://www.mieshetkari.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button