कृषी सल्ला
ट्रेंडिंग

चला झटपट जाणून घ्या; संपूर्ण ‘कांदा पिक’ लागवड पद्धत फक्त एका क्लिकवर…

Let's find out instantly; The whole 'onion crop' cultivation method with just one click फक्त

कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत

हंगाम :
महाराष्‍ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात.

खते :
कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर 1 महिन्‍याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.

लागवड :
कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत.

शेतकरी व शेतमजूर यांची शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास ‘या’ राज्यातील सरकार करणार आर्थिक मदत…

[metaslider id=4085 cssclass=””]

झारीने पाणी घालावे. बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्‍ये मिसळून दर 10 दिवसांच्‍या अंतराने 4 ते 5 फवारण्‍या कराव्‍यात. रोपांना हरब-यासाठी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे. खरीप कांदयाची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्‍बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्‍यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.

कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते. सपाट वाफयामध्‍ये हेक्‍टरी रोपांचे प्रमाण जास्‍त असले तरी मध्‍यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्‍पादन मिळते. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्‍याकाळी करावी. रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी.

राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…

मशागत :
रोपांच्‍या लागवडीनंतर शेतात तण दिसल्‍यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.

उपाय :
फुलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणासाठी पुनर्लाण केल्‍यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फॉमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू एस.सी. 550 मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्‍ल्‍यू डी पी 1000 ग्रॅम अधक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्‍य 500 लिटर पाण्‍यात मिसळून पाहिली फवारणी करावी. पहिल्‍या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्‍या वेळी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू. एस.सी. 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्‍लोराईड 50 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्‍ल्‍यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

सात बाऱ्यात ५० वर्षानंतर करण्यात येणार ‘हा’ बदल! तसेच ऑनलाइन फेरफार कसा कराल? जाणून घ्या

काढणी :
कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्‍यात काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते. यालाच मान मोडणे असे म्‍हणतात. 60 ते 75 टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाला असे समजावे. कुदळीच्‍या साहारूयाने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4, 5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्‍या रूपाने ठेवावा. नंतर कांदयाची पात व मळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

हेही वाचा :

1)आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज!

2)श्रीगोंदे येथे बहरले स्ट्रॉबेरी आणि सफरचंद! तरुणाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button