शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना व विविध सुविधा सुरू केले आहेत त्याचबरोबर पिकांच्या लागवडीकरिता अनुदाने जाहीर केली आहे, जसे की वृक्षलागवड योजना. पीक लागवडीस प्रोत्साहन देण्याचे एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढू शकतील व आनंदाने जीवन जगू शकतील,चला तर मग आज आपण एका अशा वेगळ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या अश्वगंधा ची लागवड कशी करायची तसेच यामध्ये आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याची संधी पाहणार आहोत.
अश्वगंधा ही आयुर्वेदातील एक औषधी वनस्पती आहे जी सुगंधी आणि ताकद वाढवण्यासाठी असणारी एक वनस्पती आहे. या वनस्पतीचे मूळ नाव “विथानिया सोम्नीफेरा “असे आहे. विशेष म्हणजे अश्वगंधा ही वनस्पती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामधून अनेक औषधे निर्मिती केली जाते, त्यामुळे याला नेहमीच मागणी राहते. अश्वगंधा फळांच्या बिया,पाने,साल, देठ या सगळे उपयुक्त असल्यामुळे याला सतत मागणी असते व त्याची चांगली किंमतही मिळते. अश्वगंधाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याकरिता सरकारने योजना राबवत आहे.
✍️ लागवड प्रक्रिया:
👉 अश्वगंधा लागवडीसाठी चिकन माती आणि लाल माती अतिशय योग्य आहे. उष्ण प्रदेशात याची पेरणी केली जाते. तसेच या रोपाला ओलावा देखील आवश्यक असतो काही पर्वतीय प्रदेशात म्हणजेच कमी सुपीक जमिनीत याची लागवड यशस्वीरित्या केली जाते.
👉 अश्वगंधा लागवड करण्यासाठी सर्वात योग्य काळ म्हणजे ऑगस्ट महिना एक-दोन वेळा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतात नांगरणी नंतर जमीन समतल केली जाते. नांगरणीच्या वेळेस सेंद्रिय खत घातल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो,दर हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे पेरणीसाठी पुरेसे आहे. सात आठ दिवसांमध्ये बियाणे ला अंकुर फुटतात, तसेच बारा महिन्यांमध्ये 80 टक्के जुन्या बियाण्यामध्ये वाढ होते.
अश्वगंधाची दोन प्रकारे पेरणी केली जाते पहिली म्हणजे रांग पद्धत,यामध्ये पाच सेंटीमीटर दोन झाडांमध्ये अंतर ठेवले जाते आणि ओळीपासून रेषा चे अंतर 20 सेंटिमीटर असते अश्या प्रकारे पेरणी केली जाते.
दुसरी फवारणीची पद्धत आहे, ही पेरणी पद्धतीपेक्षा चांगली आहे. हलकी नांगरणी वाळूमध्ये मिसळली जाते आणि शेतात शिंपडले जाते.दुसरी फवारणी पद्धत आहे ही पद्धत पेरणी पद्धतीपेक्षा उत्कृष्ट पद्धत मानली गेली आहे यामध्ये चौरस मीटर मध्ये 30 ते 40 वनस्पती असतात.
पेरणीनंतर अश्वगंधा ची कापणी जानेवारी ते मार्च या महिन्याच्या कालावधीत अश्वगंधा ची झाडे मुळापासून विभाग केली जातात व त्याचे लहान लहान तुकडे केले जातात बिया कोरडी पाने फळे असे वेगवेगळे विभाग केले जातात त्याचे बरेच उपयोगही आहेत साधारणपणे अश्वगंधा मधून आठशे मूळ आणि 50 किलो बिया मिळतात.
आपण योग्य प्रकारे मार्केटिंग केल्यास अश्वगंधा औषध बनवणार्या कंपन्यांना थेट विकू शकतो व उत्तम लाभ ही मिळू शकतो.