कृषी सल्ला

वेगवेगळ्या पिकांवरील उपयुक्त तणनाशके जाणून घ्या फक्त एका क्लिक वर…

Learn useful herbicides on different crops with just one click

उस: या पिकामध्ये जास्त प्रमाणात तण उगवते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ D + Sencor + Atrazin हे तणनाशके वापरावे ज्याचे प्रमाण ५ ml + २ gm + ३ gm असावे.

ज्वारी, बाजरी : पेरणीनंतर 2 निंदण्या व 2 कोळपण्या 3 आणि 6 आठवडयांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपूर्वी अ‍ॅट्रॅझीन 0.75 कि हे. या प्रमाणात फवारावे.

कपाशी : पेरणीनंतर तीन निंदण्या व कोळपण्या अनुक्रमे 3, 6 आणि 9 आठवडयांनी द्याव्यात. किंवा पीक उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलीन 1.00 कि./हे. या प्रमाणात फवारणी करावी नंतर 6 आडवडयांनी एक कोळपणी व खुरपणी करावी.

टोमॅटो: पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला जर तणांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर Targa Super & Sencor हे तणनाशक वापरावे जे की १-१.५ ml + १ gm डोस असावा.

तूर : पेरणीनंतर तणांच्या प्रादुर्भावप्रमाणे तीन निंदण्या आणि कोळपण्या 3, 6 आणि 9 आठवड्यांनी द्याव्यात किंवा पीक उगवणीपूर्वी मेटोलॅक्लोर 1.0 कि/हे. या प्रमाणात फवारावे.

सोयाबीन: या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Iris हे तणनाशक वापरा ज्याचा डोस २ ml असावा, सोयाबीन पिकासाठी Iris हे तणनाशक खूप प्रभावी आहे.

कलिंगड, खरबूज, वांगी, मिरची, शिमला मिरची, काकडी, भेंडी, वाटाणा, शेपू , मेथी, कारले, दुधी भोपळा, दोडका, चवळी, फरशी, गवार, बिट: या पिकांमधील तण जाळण्यासाठी तुम्ही Targa Super हे तणनाशक वापरा ज्याचा डोस १.५ ml ते २ml असावा.

गहू: या पिकातील तण जाळण्यासाठी तुम्ही Algrip हे तणनाशक वापरावे ज्याच्या डोस चे प्रमाण ८ gm प्रति एकर असावे.

केळी, पपई, आंबा, सीताफळ, चिकू, पेरू या पिकातील तण रोखण्यासाठी Targa Super + Gramazone हे तणनाशक वापरावे ज्याचा डोस २ ml ते १० ml या प्रमाणात असावा.

टीप : अधिक माहिती साठी तज्ञांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1. पिकांवरील लष्करी आळीमुळे हैराण झाला आहात का तर करा ‘ह्या’ उपाययोजना..

2. पशुसंवर्धनाच्या विकासासाठी केंद्रकडून राज्यसरकारला 15 हजार कोटींचा निधी! ‘या’ योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना होईल लाभ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button