महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) बऱ्याच ठिकाणी, उसाचे उत्पादन घेण्यात येते, ऊसाची ओळख म्हणजे सर्वात महत्वाचे नगदी पीक (Cash crop) म्हणून त्याकडे पाहिले जाते, परंतु दिवसेंदिवस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (modern technology) वापर वाढत चालला आहे त्याचप्रमाणे पारंपारिक शेती (Traditional farming) केल्यास उत्पादन खर्च देखील तितकाच वाढत चालला आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसाठी केल्यास शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते, उसाचे उत्पादन घेताना आवश्यक आधुनिक यंत्रे व त्याचा उपयोग उपयोग आपण पाहुयात :
ऊस पाचट बारीक करण्याचे यंत्र: (Sugarcane grinder)
उसाची कापणी झाल्यानंतर, बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाचत जमिनीवर पसरले जाते, पाचटाचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो, बरेचदा जमिनीवर आच्छादन (Cover) करण्याकरिता पाचटाचा उपयोग केला जातो, त्याच प्रमाणे या पाचटाचा उपयोग सेंद्रिय खत (Organic manure)निर्मितीसाठी देखील केला जातो. रोटावेटर सदृश्य यंत्राच्या साह्याने तीन फूट पिकांच्या खोडव्यात वापरून सरीतील पाचट आचे दहा ते पंधरा सेंटीमीटर चे बारीक तुकडे करता येतात. पुढे असणारे रोलरमुळे पाचट सारिमध्ये दाबली जातात, रोटर (Rotor) मध्ये बसवलेल्या मधल्या भागामध्ये जे आकाराचे पाते तुकडे करण्यास मदत करतात. तर दोन्ही बाजूला बसलेले पाते पाती वरंब्याच्या बगलेची माती काढून पाचटाचा सोबत थोड्या प्रमाणात मिसळली जाते. या यंत्राच्या साह्याने एका दिवसात अडीच ते तीन एकर क्षेत्रावरील पाचट बारीक करण्यात येते ज्या शेतकर्यांकडे रोटावेटर (Rotavator) आहे त्यालाच पातेची जोड दिल्यास कमी खर्च लागतो.
कृषिराज: (Krishiraj)
या यंत्राला तीन लोखंडी फणा असतात, या यंत्राच्या सहाय्याने उसाला भर देणे व सरी वरंबा फोडण्यासाठी केला जातो. तसेच रिझर (Ridge) जोडून उसाची बांधणी करता येते. तसेच मधला फणा काढून टाकल्यास हे यंत्र ऊस लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी उसामधील आंतरमशागतीसाठी (For intercropping) वापरता येते. तसेच हा फणा अवजारांना जोडल्यास,ऊस लागणीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी सरी-वरंबा फोडण्यासाठी उपयोग करतात. सरी वरंबा फोडल्यामुळे जमीन सपाट व भुसभुशीत होते
ट्रॅक्टरचलित ऊस लागवड यंत्र: (Tractor driven cane planting machine)
या यंत्राच्या (Of the machine) साह्याने जमीन सपाटीकरण असल्यास दोन रिजरच्या साह्याने सऱ्या पाडणे त्याचप्रमाणे उसाचे 30 सेंटी मीटर लांबीचे तुकडे करून बेणे सरीत पाडणे, बेन्यावर माती पसरणे दाणेदार खते पेरून देणे, रोलर च्या मदतीने माती दाबणे इत्यादी कामे एकाच वेळी केली जातात यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात आर्थिक बचत (Financial savings) होते तसेच वेळही वाचतो.(It also saves time.) यंत्राच्या साह्याने 30 ते 40 टक्के पारंपरिक शेतीच्या तुलनेत खर्च वाचतो.
हेही वाचा :
1. जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?
2. जाणून घ्या खरीप हंगामातील ‘सूर्यफूल’ लागवडीची संपूर्ण माहिती