कृषी बातम्या

Sunflower Cultivation | सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात सूर्यफूल (Sunflower) घेतले जाते.

Sunflower Cultivation | या लेखात आपण सूर्यफूल लागवडीबद्दल (Sunflower planting) माहिती जाणून घेऊयात. एकूण खाद्यतेल (Edible oil) यापैकी १० टक्के उत्पादन सूर्यफुलापासुन मिळते. कमी पाण्यात येणारे तसेच कमी उत्पादन खर्च (Production cost) यामुळे शेतकऱ्यांना परवडणारे पीक (Crop) आहे.

Sunflower Cultivation | सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान

Land Preparation | जमीन
सूर्यफूल हे पीक सगळ्या हंगामात घेता येते. सूर्यफूल या पिकासाठी योग्य निचरा ( Well drained) होणारी मध्यम ते भारी (Medium- Light) जमीन निवडावी. पिकाच्या वाढीसाठी चांगली भुसभुशीत जमीन तयार करावी.जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ (pH) असल्यास रोपांची चांगली वाढ होते

Sowing Time | पेरणीची वेळ
खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी जुलैच्या पहिल्या ( 1 July- 15 July) पंधरवड्यात करावी.

वाचा: Black gram Cultivation | कमी कालावधीत भरघोस उत्पादनासाठी ‘अशी’ करा उडीद पिकाची सुधारित लागवड

Seed Treatment | बीज प्रक्रिया
बियांच्या लवकर उगवणीसाठी पेरणीपूर्वी बियाणे १२-१४ तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवावे. बियाण्यास २-३ ग्रॅम थायरम( Thiram) किंवा कॅप्टन ( Captan)या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. अझोटोबॅक्टर / अॕझोस्पिरीलम( Azotobacter / Azospirullum) व पी. एस. बी. यांसारखी जिवाणू खते २० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे.

Sowing | पेरणी
सूर्यफुलाची पेरणी जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या अंतरावर पेरणीयंत्राच्या सहाय्याने करावी. टोकण पद्धतीने सुध्दा सूर्यफूल पेरता येते व बियाण्याची बचत होते. सूर्यफूल ५ सें.मी.( 5cm) पेक्षा जास्त खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी. खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी जुलैच्या (1 July- 15 July) पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर तर दोन झाडातील अंतर ३० सेंटिमीटर ठेवावे व बी ३ ते ५ सेंटिमीटर खोलवर पेरावे.

Fertilizer Management | खत व्यवस्थापन
सूर्यफुलाचा ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, २५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व बागायती पिकास ६० किलो नत्र ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश या प्रमाणात द्यावे. या मात्रेपैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० दिवसाच्या आत द्यावी.

Varieties | वाण
सूर्या मॉर्डन, पिकेव्ही एस .एफ -९, टि. ए. एस. ८२,फुले भास्कर, भानू, एस एस ५६, फुले रविराज
के बी एस एच १

वाचाPearl Millet Cultivation | खरिपातील बाजरी भरघोस उत्पादनासाठी फायदेशीर, जाणून घ्या लागवडीचे तंत्रज्ञान…

Sowing Distance | पेरणीची अंतर
पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर तर दोन झाडातील अंतर ३० सेंटिमीटर ठेवावे. ( 45*30)

Seed Rate | बियाणे प्रमाण
सुधारित वाण : ८-१० किलो / हेक्टर , संकरित वाण – ५-६ किलो / हेक्टर.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button