कृषी सल्ला

जाणुन घ्या अझोला वनस्पती चे ” अजब जनावरांना फायदे; दुध उत्पादन मध्ये वाढ आणि पैसेची हि बचत…

अझोला हे निळे-हिरव्या रंगाचे शेवाळ वर्गातील वनस्पती आहे. अझोलाचा वापर प्रामुख्याने भात शेतीमध्ये नत्र स्थिरीकरणासाठी केला जातो. अझोला हिरव्या चा-याला उत्तम पर्याय असुन दिवसेंदिवस दुध उत्पादनामध्ये बाढहोत आहे परंतू दुध उत्पादनासाठी येत असलेल्या खर्चामध्येही वाढ होत आहे. हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न व अनियमित पाऊस यावर मात करण्यासाठी अझोला हा उत्तम पर्याय आहे.

अझोलामध्ये २९-३५ टक्के प्रोटीन आहेत ते पचनास अत्यंत हलके असून १० ते १५ टक्के मीनरल व ७ ते १० टक्के अमिनो अँसीड आहे. जनावरास दररोज २ ते ३ किलो अझोला खायला दिल्यास १ ते १.५ किलो पशुखाद्य ब सरकी पेंड कमी करता येतो. अझोलामध्ये २५ ते ३० टक्के पर्यंत प्रथिने आहेत. तसेच जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण चा-याच्या तुलनेत अधिक आहे. त्यामूळे जनावरांच्या आहारात पशुखाद्यास पुरक म्हणून याचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होईल.

तसेच कोंबडयांच्या खाद्यात बापर केल्यास अंडी उत्पादन आणि वजन वाढीसाठी फायदा होईल.

प्रथिने ______________२५ ते ३५ टक्के

जीवनसत्वे बी. १२_____१.१९ मी.ग्रॅम / १०० ग्रॅम

बिटा कॅरोटीन ________१३४० मायक्रोग्रॅम/ १०० ग्रॅम

केल्सीयम____________६८ मी ग्रॅम /१०० ग्रॅम

लोह ________________७.३ मी ग्रॅम /१०० ग्रॅम

मॅग्नेशियम____________४३.७ मी ग्रॅम /१०० ग्रॅम

तांबे_________________०.९ पीपीएम

जस्त________________४१ पीपीएम

अझोलामध्ये २५ ते ३५ टक्के प्रथिने, १० ते १५ टक्के खनिजे, ७ ते १० टक्के अमिनो आम्ले आहेत. महत्वाचे यामध्ये लीग्रीन असल्यामुळे जनावरांना सहज पचते. दूध उत्पादनात ५ ते १० टक्के वाढ दिसून येते. जनावरांच्या खुराक किंवा खाद्यावरील खर्चात बचत होते, दुधाची गुणवत्ता सुधारते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button