कृषी बातम्या

खोडवा ऊसाचे जाणून ‘ घ्या’ हे फायदे..

Learn the benefits of 'Khodwa' sugarcane.

ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा ठेवला जातो. या खोडवा उसाची योग्य काळजी व सुधारित तंत्राचा वापर केल्यास अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते त्यामुळे खोडवा उसाकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारखान्यासह शेतकऱ्यांना खोडवा ऊस फायदेशीर असतो.चला तर मग आपण पाहूया खोडवा उसाचे फायदे

  1. खोडवा ऊस एक ते दोन महिने लवकर तयार होतो
  2. खोडवा ऊस पाण्याच्या ताणासाठी जास्त सहनशील असतो यामुळे उत्पादन अधिक मिळू शकते.
  3. बेणे, बेणेप्रक्रिया, ऊस लागवड इत्यादी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते
  4. ज्या उसाची लागवड शंभर हे तर त्यापेक्षा जास्त आहे अशा उसाचा खोडवा ठेवल्यास फायदेशीर ठरतो.
  5. पाचटाचे आच्छादन नियंत्रण केल्यास तन नियंत्रण होते तसेच मशागतीसाठी खर्च व पाण्यात बचत होते.
  6. खोडवा ऊस ठेवण्यासाठी जमीन सुपीक व निचऱ्याची असावी.
  7. खोडवा ऊस करताना पूर्वमशागत करावी लागत नाही त्यामुळे वेळ व पैसा यांची बचत होते.

*खोडवा राखण्याची वेळ

ऊस तोडण्याची वेळ ऑक्टोबर पासून मे पर्यंत केली जाते. खोडवा ठेवण्यात जसजसा उशीर होतो त्याप्रमाणे उत्पादन देखील कमी मिळते. खोडवा 15 फेब्रुवारी नंतर ठेवला गेल्यास शक्यतो किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. तसेच पाणी कमी पडल्यास उत्पादनामध्ये देखील घट होण्याची शक्यता असते.

ऊसतोड:

👉 जेव्हा ऊसतोड करायचे आहे त्याअदोगर पंधरा ते वीस दिवस उसाला पाणी देऊ नये.

👉तुटलेला उस 24 तासाच्या आत मध्ये गळल्या गेल्यावर ऊस उत्पादनात घट होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button