बहुतेक शेतकरी शेतामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर करत असतात. रासायनिक खताचे योग्य वापर केल्यास उत्पादनक्षमता वाढते परंतु रासायनिक खताचा अतिरेक झाल्यास देखील उत्पादनात घट होते. त्यामुळे रासायनिक खताचे योग्य वापर करणे फायदेशीर ठरते.
रसायनिक खताचा वापर केल्यामुळे ,पिकांचे उत्पादन वाढते, परिणामी शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये देखील वाढ होते मात्र या सर्व गोष्टींचा विचार करताना जमिनीचे आरोग्य देखील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रासायनिक खते वापरताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी हे पाहुयात.
रासायनिक खतांची मात्रा:
रासायनिक खताची मात्रा जेवढी शिफारस आहे तेवढेच पिकांना द्या त्याचा अतिरेक होता कामा नये. त्यासाठी जमल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
हे ही वाचा गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…
नत्रयुक्त खतांचा वापर करताना घ्या अशी काळजी
नत्रयुक्त खता वापर करताना (युरिया ) नीम कॉटेड युरिया वापरण्यास प्राधान्य द्या त्याच प्रमाणे युरियाची मात्रा एकाच वेळेस न देता पिकांच्या अवस्था लक्षात घेऊन खतांची मात्रा द्या, बरेदा पाण्याची पातळी व्यवस्थित नसल्यास जमिनीतील नत्र उडून जाऊ शकतात किंवा पाण्याने वाहून जाऊ शकतात यासाठी पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवा.
स्फुरद व पालाशयुक्त खतांचा वापर
पिकांच्या योग्य वाढीसाठी कमी कालावधीच्या पिकात स्फुरद व पालाशयुक्त खते एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी बियापासून पाच सेंटीमीटर खोलीवर द्यावीत.स्फुरदाची कार्यक्षमता अधिक वाढण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू खताचा वापर करावा. सुरज युक्त खतांचा वापर शेणखतात मिसळून केल्यात याची उत्पादन क्षमता वाढते.
हे ही वाचा फेसबुकचे स्मार्टवॉच’ पाहिले आहे का? जाणून घ्या काय आहेत ‘या’ स्मार्टवॉच चे फीचर्स…
पिकांमध्ये फेरबदल
जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक शेतकरी पिकांची फेरपालट करत असतं अशावेळी जमिनीमध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा कडधान्य लावली असल्यास रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.
मातीचे आरोग्य
रासायनिक खतांचा वापर करताना म्हणजेच युरिया, अमोनियम सल्फेट, तसेच स्फुरदयुक्त खते जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून देऊ नये यामुळे मातीचे आरोग्य बिघडते.
हे ही वाचा
तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…
मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…