केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार शेतकरी विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या योजना जाहीर करत असते. त्यातील सर्वात महत्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड.
या योजनेद्वारे बिनव्याजी कर्ज (Interest free loan) प्राप्त होते, व रक्कम मोठी असल्यास कमी व्याजदराने कर्ज प्राप्त होते. आपण घेतलेले कर्ज योग्य वेळेत फेडल्यास 4%प्रमाणे व्याजदराने हे कर्ज उपलब्ध होते.
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा या करता किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) घेण्यासाठी बँकांची फी रद्द (Bank fees canceled) करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड काढताना केवायी जमा करण्याची प्रक्रिया देखील रद्द करण्यात आलेली आहे.
वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…
किसान क्रेडिटकार्ड कसे काढायचे (How to get a Kisan Credit Card)
त्यासाठी गावोगावी कॅम्प लावण्यात येणार आहे, परंतु आपण देखील हे कार्ड काढू शकतो.यासाठी तुम्हाला पीम किसान सन्मान योजना च्या वेबसाईट वर जावे लागेल.जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा. केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत जमा करा. प्रक्रियेत नव्यानं केवायसी प्रक्रिया करावी लागणार नाही. परंतु काही वेळेस केवायसी ची मागणी केली जाऊ शकते.
मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?
किसान क्रेडीट कार्ड कोण बनवू शकतो… (Who can make a farmer credit card.)
शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो व्यक्ती किसान क्रेडिट कार्ड बनवू शकतो.
हेही वाचा :
2)काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!