ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळून देणारे, ‘उडीद’ पिकाबद्दल जाणून घ्या, संपूर्ण माहिती…

Learn more about the urad crop, which yields more in less time, complete information संपूर्ण

खरीप हंगामामध्ये (In the kharif season) तुरीच्या (Of the trumpet) खालोखाल मूग (Moog) आणि उडीद (Urad) ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी (For double as well as mixed cropping system) ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत.

*जमीन (Land)

मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.

पूर्वमशागत

उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळावच्या पाळ्या मारुन सपाट करावी. धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.

हेही वाचा :गणेश चतुर्थी दिवशी येणार, जगातील ‘सर्वात स्वस्त मोबाईल फोन’ वाचा सविस्तर बातमी…

पेरणीचा कालावधी (Sowing period)

पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान करावी पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते

बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया (Seed rate and seed processing)

हेक्टरी १० ते १५ किलो बियाणे पुरेसे आहे पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किलो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर १० किलो बियाण्यास जिवाणु संवर्धक रायझोबियम व पीएसबी प्रति २५० ग्रॅम लावून पेरणी करावी.

पेरणीचे अंतर – ४५ X १० सेमी

खतांची मात्रा – जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरावे. पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

आंतरमशागत – पेरणीनंतर सुरुवातीच्या एक महिन्यात तण नियंत्रणासाठी एक खुरपणी व दोन कोळपण्या कराव्यात.

आंतरपीक पद्धतीचा वापर – या पिकांच्या कालावधीमुळे ही दोन्ही पिके तूर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.

हेही वाचा :सोयाबीनला मिळाला उच्चांकी दर! सोयाबीन उत्पादकांना येणार का ‘अच्छे दिन’

उडदाच्या सुधारित जाती (Improved breeds of flying)

१)बीडीयू -१:
दाणे मध्यम ते काळ्या रंगाचे व टपोरे, कालावधी ७० ते ७५ दिवस, उत्पादन ११-१२ क्विं/हे

२)टीएयु -१ :
कालावधी ७० ते ७५ दिवस, भूरी रोगास प्रतिकारक, उत्पादन १०-१२ क्विं./हे

3)टीपीयु-४:
कालावधी ६५ ते ७० दिवस, उत्पादन १० ते ११ क्विं/हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस

४) टीएयु २:
कालावधी ७० ते ७५ दिवस, विदर्भासाठी प्रसारित, उत्पादन १०-१२ क्विं/हे

५) पी के व्ही
उडीद १५ कालावधी ६५ ते ७० दिवस, विदर्भासाठी प्रसारित, उत्पादन १०-१२ क्विं./हे

हेही वाचा : ‘ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…

रोग-कीड नियंत्रण(Disease-pest control)

भूरी – मूग पिकावर विशेषत: भूरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. भूरी रोग फुलांच्या पुर्वी अथवा पीक फुलो-यात असताना आल्यास जास्त प्रमाणात होते. नियंत्रणासाठी सल्फेक्स ०.३० % किंवा २०-२२ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच ३० पोताची गंधकाची भुकटी २० किलो हेक्टरी धुरळणी करावी.

शेंगा पोखरणारी अळी – या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी किनॉलफॉस ३५ ईसी ०.०७% , २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून कीडनाशकाची फवारणी करावी.

पीक काढणी – पिकांच्या बहुतांश शेंगा पक्व झाल्यास पावसाचा अंदाज पाहून काढणी त्वरीत करुन तोडणी केलेल्या शेंगा व्यवस्थित पसराव्यात. तोडणी केलेल्या शेंगा उन्हात वाळवून काठीने बडवून किंवा ट्रॅक्टरने मळणी करुन खेळत्या हवेच्या वातावरणात साठवाव्यात उत्पादन १०-१२ क्विंटल/हेक्टर

सौजन्य : महाराष्ट्र सरकार

हेही वाचा :

1)सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

2)सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button