योजना

जाणून घ्या ; “संरक्षित शेती योजनेची” माहिती व पात्र व्यक्ती व अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

Learn; Information on "Protected Agriculture Scheme" and complete information on eligible persons and how to apply with just one click

शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच फळ शेती लागवड करतही शासनाने शेतकऱ्यांना अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, अनेक वेळा अशा योजनांची माहिती नसल्याकारणाने शेतकरी लाभार्थी होण्यापासून वंचित राहत असतो.

अशा योजनांच्या माध्यमातून शासनाचे उद्दिष्ट असते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांच्यामध्ये आहेत आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे याकरता शासन नेहमीच प्रयत्नशील असते. फळबाग लागवड, संरक्षित शेती, शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीचे विविध प्रकारच्या योजना आहेत शासनाने राबवणाऱ्या आहेत. अशाच प्रकारे शेतीला उपयुक्त असणाऱ्या योजनेची आपण माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा : उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

संरक्षित शेती योजना(Protected Farming Scheme)

या योजनेचा प्रमुख उद्देश बेरोजगार तरुणांना तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्ये तरुणांना संधी उपलब्ध करून देणे त्याकरता आर्थिक सहाय्य पुरवले जाते. हंगामी पिके तसेच उत्पादनासाठी प्रोत्साहन देणे करता या योजनेची सुरुवात झाली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना भरघोस पिके उपलब्ध करून देणे ही या संरक्षित शेती योजनेचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा : जनावरांना ह्या एका कारणामुळे होऊ शकते विषबाधा, व जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी…

लाभार्थी व्यक्तीची पात्रता:(Beneficiary Eligibility:)
१) लाभार्थी व्यक्तीच्या स्वतःच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे.

२)हरित गृह (Green house) आणि शेडनेट गृहामध्ये फलोत्पादन पिकांची लागवड करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

३) योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, शेतकरी समूह व बचत गटयांना लाभ देण्यात येतो.

४) योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास हरितगृह व शेडनेट गृहासाठी प्रत्येक कमीत कमी 500 चौ.मी. तर जास्तीत जास्त 4,000 चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल.

हेही वाचा“अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

कसा अर्ज करावा (How to apply)
१)या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळावर क्लिक करा.
(https://hortnet.gov.in)

२) या मध्ये लागणारे डॉक्युमेंट्स (Documents) म्हणजेच त 7/12 चा उतारा, 8-अ, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकीत प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनू. जाती, अनू. जमाती शेतकर्‍यांसाठी) विहीत नमुन्यातील हमीपत्र इत्यादी कागदपत्रे (Documents) या संकेतस्थळावर अपलोड करा.
अनुदान लाभार्थी शेतकर्‍याच्या बँक खात्यावर डीबीटी ने जमा होते.

३) अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

हेही वाचा.

१)सोयाबीनचे किमतींमध्ये विक्रमी वाढ शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे का?
२)आपल्या मोबाईल वर मिळवा कृषी ज्ञानाचा नवीन खजाना कृषी संबंधित अधिक माहिती मिळवण्याकरता खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button