सोयाबीन (Soybeans) हे महत्वाचे तेलबिया (Oilseeds) पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर (Globally) महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. चला पाहू ; सोयाबीनची उत्पादकता कमी असण्याची कारणे…
- नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा सोयाबीन पीक घेताना असणारा अभाव.
- बरेचदा पावसावर अवलंबित सोयाबीनची शेती असल्यामुळे, लागवड झाल्यापासून 30 ते 40 दिवसांमध्ये पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादकता कमी होऊ शकते. *वारंवार या पिकाची लागवड केल्यास सोयाबीनची उत्पादकता कमी होऊ शकते. *सोयाबीन लागवड करताना हलक्या व मध्यम जातीच्या जमिनीमध्ये लागवड केल्यास. *सोयाबीनवर कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव झाल्यास, उत्पादनामध्ये घट येऊ शकते. *अनेक नैसर्गिक संकटामुळे देखील सोयाबीनची उत्पादकता घटू शकते. सोयाबीन पिकाला आवश्यक असणारे घटक पुढील प्रमाणे:
हेही वाचा :
1) नत्र (Nitrogen )
सोयाबीन पिकास नत्राचे मोठे योगदान आहे, पिकाला रंग मिळवून देण्याचे काम नत्र करते. पीक वाढीसाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
2) पोटॅश/ स्फूरद (Potash / Phosphorus)
पोटॅश मुळे पीक जोमाने वाढते, फुले व फळधारणेसाठी अत्यावश्यक असते,पेशींमध्ये सुधारणा घडवून आणते. पेशीच्या जडण-घडण मध्ये आवश्यक,चयापचन श्वसन क्रियासाठी आवश्यक आहे.
हेही वाचा :जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…
3) कॅल्शियम / झिंक (Calcium / Zinc)
सोयाबीन मधील पेशीभित्तिका यांचा महत्त्वाचा समावेश, पेशी विभाजना साठी कॅल्शियम चे महत्वाचे कार्य, यामुळे पिकांचे टोके, पिकांची मुळे, तसेच शेंगा वाढण्यासाठी कॅल्शियमचे योगदान झिंगचे महत्व वनस्पतीतील पीक पोषण संजीवके तयार करण्यासाठी अत्यावश्यक.
हेही वाचा :तारफुली पद्धत म्हणजे काय? जाणून घ्या कोणत्या पिकासाठी ही उपयुक्त ठरते…
बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने दिला सल्ला
चला झटपट जाणून घ्या; संपूर्ण ‘कांदा पिक’ लागवड पद्धत फक्त एका क्लिकवर…