राज्यातील बहुतेक ठिकाणी सोयाबीनचे (soybeans) उत्पादन घेतले जाते, यावर्षी सोयाबीन पिकाला मागणी जास्त असल्याकारणाने त्याला दरही चांगला मिळाला, त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन पीक घेण्याकडे कल दिसून आला. परंतु राज्यात सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्याचे (Cyclones) संकट ओढवले असून सोयाबीन पिकावर पडणाऱ्या चक्रीभुंग्याचा कीड व्यवस्थापन (Pest management) वेळेत करणे गरजेचे आहे
सोयाबीनवर चक्रीभुंग्याचे आक्रमण झाल्यास उत्पादनामध्ये 30 टक्केपर्यंत घट निर्माण होते, त्यामुळे सोयाबीनला फुलकळी निर्माण होण्याच्या आधी त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
चक्रीभुंगा पीकवाढीच्या दरम्यान देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर खाचा करून त्यामध्ये अंडी (Eggs) घालते, यामुळे झाडातील अन्नपुरवठा बंद (Food supply cut off) होऊन झाडे वाळून जातात. त्यामुळे वेळेत शेतकऱ्यांनी चक्रीभुग्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळेत पुढील उपाय योजना (Measure plan) कराव्यात.
वाचा : कपाशीवरील तुडतुडे किडींवर नियंत्रण कशाप्रकारे करावे, नुकसान टाळण्यासाठी आहे तुमच्या फायदेचा सल्ला…
सोयाबीनचे पेरणीसाठी उशीर झाल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते पेरणी ठराविक कालावधीतच पूर्ण करावी. सोयाबीनची पेरणी करताना शिफारशीनुसारच बियाण्यांचा वापर करावा, तसेच पेरणी दाट झाल्यास (If sowing is dense) चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
ज्या ठिकाणी चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी फोरेट (दाणेदार) १० टक्के १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे. त्याच प्रमाणे ज्या झाडांवर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे ते झाडे नष्ट करावीत.
वाचा : जाणून घ्या, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल बद्दल सविस्तर माहिती…
चक्री भुंग्याच्या अंडी यांचा नायनाट करण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी (Spray of neem extract) केल्यास उत्तम ठरेल. तसेच पेरणी केल्यावर तीस-पस्तीस दिवसानंतर प्रादुर्भाव आढळल्यास, दहा दिवसाच्या आत मध्ये ट्रायझोफॉस ४० ई. सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड. सी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे चक्रीभुंगा कीडीवर नियंत्रण मिळेल.
हे ही वाचा :