इतर

पाच वर्षाखालील लहान मुलांचे बनवा अशा प्रकारे आधार कार्ड जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया…

पाच वर्षाखालील मुलांचे (Children under the age of five) देखील आधारकार्ड (Aadhaar card) बनू शकते, आधार कार्ड लहानपासून मोठ्यापर्यंत लागणाऱ्या महत्वाचा दस्तऐवज आहे. मुलांच्या शाळेतील ॲडमिशन (Admission) असो किंवा एखाद्या योजनेचा लाभार्थी (Beneficiaries of the scheme) या सर्वांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे.

मूल 5 वर्षांपेक्षा लहान असेल तर आपण बायोमेट्रिक (Biometric) डेटाशिवाय आधार बनवू शकता. त्याला बाल आधार असे म्हटले जाते तर चला पाच वर्ष खालील बालकांचे कसे आधार कार्ड काढावे हे आपण पाहू..

पाच वर्षाखालील आधार कार्ड निळ्या रंगाचे (Blue) असून 5 वर्षानंतर अवैध ठरवले जाते. या आधार कार्ड ला बाल आधार (Child support) म्हणून ओळखले जाते. पाच वर्षानंतर या आधार कार्ड अद्यावत करणे आवश्यक आहे.यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तसेच आधार केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक अद्ययावत करावे लागेल. अनेक सरकारी योजनांचा लाभ बाल आधार कार्डाद्वारे मिळू शकतो.

लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी जवळच्या आधार केअर सेंटर मध्ये जावे लागेल. येथे एक फॉर्म भरावा. फॉर्म सोबत मुलाच्या जन्माच्या दाखल्याची छायाप्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मुलाच्या पालकांच्या आधार कार्डची प्रत जोडावी लागेल. पालकांना घराच्या पत्त्यासाठी त्यांच्या कोणत्याही ओळखपत्रांच्या छायाप्रतीची आवश्यकता असेल.

हा अर्ज केल्यानंतर मुलांचे आधार कार्ड बनण्यास सुमारे 90 दिवस लागतात. आधार कार्ड बनवण्यासाठी गेला असता तुम्हाला एनरोलमेंट स्लिप (Enrollment slip)मिळेल तसेच आधार कार्ड संबंधित माहितीसाठी आयएसएएम नोंदणी आयडीद्वारे आधारची स्थिती तपासू शकता.

हे ही वाचा :


1. केंद्र सरकारकडून मोठा निर्णय…! घरगुती एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी निवडता येणार आपल्या पसंतीने गॅस एजन्सी…

2. आरोग्यवर्धक शेळीचे दूध: शेळीच्या दुधापासून ‘ हे ’ फायदे आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button