कृषी सल्ला

जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?

Learn; How to file a crop insurance complaint on your mobile?

शेतकऱ्यांच्या हितार्थ, पंतप्रधान पीक विमा योजना (Prime Crop Insurance Scheme) राज्यामध्ये राबविण्यात आली, परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फायदा पाहिजे इतका झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून (From farmers) नाराजीचे सूर व्यक्त होताना दिसत आहेत.

पिक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत, पीक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला की हे कुठे बघायचं? तसेच पीकविम्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या नेमक्या कुठं नोंदवायच्या? (complaint about crop insurance) याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आज आपण पाहुयात पिक विमा संदर्भात तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कुठे तक्रार करायची या संदर्भातील संपूर्ण माहिती

हेही वाचा : पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची घ्या; ‘अश्या’ पद्धतीने काळजी काळजी…

[metaslider id=4085 cssclass=””]

जर तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला असेल तर आपण हे पाहूया तुमचा पिक विमा मंजूर झाला आहे कि नाही हे कसे पाहिचे यासाठी खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साह्याने देखील पाहू शकता.

याकरता तुम्हाला पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला Application Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

पिक विमा काढल्यानंतर जी पावती मिळाली आहे. त्या पावती वरील क्रमांक टाका, त्यानंतर कॅप्चा व्यवस्थित भरावं व त्यानंतर Check Status वर क्लिक करा.

तुमचा विमा मंजूर झाला असेल तर अप्रूव्ह असे लिहून येईल.

हेही वाचा : मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर…

पिक विमा संदर्भात तक्रार कशी कराल?

परंतु काही वेळेस, पिक विमा घेऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये, त्यासंदर्भात अनेक प्रश्न असतात, तसेच काही वेळा पिक विमा बद्दल नाराजी शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होते. अशा वेळेस तक्रार कोठे करायची हे त्यांना ठाऊक नसते. जर तुम्हालाही पिक विमा संदर्भ तसेच कोणती तक्रार (Complaint) असेल, तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पिक विमा संदर्भात शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत पूर्वसूचना द्यावी.

मोबाईलमधील मोबाईलमधील Crop Insurance App (क्रॉप इन्शुरन्स) ॲपद्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकाद्वारे ही पूर्वसूचना देता येईल.

इंटरनेटमुळे अॅप सुरू होत नसेल किंवा टोल फ्री नंबर सतत एंगेज येत असल्यास तातडीने आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात स्वतः जाऊन पूर्वसूचना द्यावी.

तुमची तक्रार नोंदवून घेतली नसेल तर तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे. अध्यक्ष असलेले तहसीलदार किंवा सदस्य सचिवपदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतात. मात्र, याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे तक्रारीची पोच घेणे गरजेचे आहे. पोच अर्जावरचा सही, शिक्का हा तुमच्या तक्रारीचा अधिकृत पुरावा असेल.

अशा पद्धतीने तुम्ही पिक विमा संदर्भात तुमच्या अडचणीचा पाठपुरावा करू शकता.

हेही वाचा :

1)आरोग्यवर्धक शेळीचे दूध: शेळीच्या दुधापासून ‘ हे ’ फायदे आहेत..

2)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला जनतेशी संवाद! 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय…..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button