जमीन :(Land)
मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी (Toor) फार चांगली. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते.
कालावधी :(Duration)
जूनच्या दुस-या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजसी उशिरा होईल. त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी १० जुलैपूर्वी पेरणी करावी.
बहुतांशी पीक :(Mostly peak)
तूर हे पीक बहुतांशी म्हणून घेतले जाते. तूर + बाजरी (१:२) तूर + सूर्यफूल (१:२), तूर +सोयाबीन (१:३ किंवा १:४) तूर + ज्वारी (१:२ किंवा १:४), तूर +कापूस, तूर + भूईमूग, तूर+मूग, तूर+उडीद (१:३) अशाप्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येते. तूरीचे सलग पीक सुध्दा चांगले उत्पादन देते.
हेही वाचा : चक्रीवादळमुळे नुकसान झाले असल्यास ‘हे’ काम करा!
पेरणी करताना घ्यायचे अंतर :(Distance to be taken while sowing)
सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल-८७ या वाणाकरीता ४५ X १० सें.मी अंतर ठेवावे, ए.के.टी.-८८११ करिता ४५ X २० सेमी अंतर ठेवावे. अधिक कालावधीच्या वाणाकरिता ६० X २० से.मी अंतर ठेवावे.
आंतरपिके(Intercropping)
तूर हे पीक सूर्यफूल, मूग,उडीद, सोयाबीन, भुईमुग, ज्वारी, बाजरी कपाशी या सरळ पिकामध्ये आंतरपिक म्हणून घेतले जाते आंतरपिकासाठी निवडावयाच्या तूरीच्या जाती व मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्या काळात ३ ते ४ ओळी सोयाबीन आणि एक ओळ तूर अशा पध्दतीने दोन्ही
खत व्यवस्थापण :(Fertilizer management:)
सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पेरणीचे वेळी द्यावे सारखे मिश्र पिक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलली खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करीता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.
हेही वाचा : टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…
पाणी व्यवस्थापन :(Water management)
तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते. तथापि, पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पीकास वाढीच्या अवस्थेमध्ये (३० ते ३५ दिवस), फुलो-याच्य अवस्थेमध्ये (६० ते ७० दिवस) आणि शेगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
कीडनाशके (Pesticides)
तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटेअळी, पिसारी पतंग, काळी माशी, या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. ट्रायकोडर्मा, क्रायसोपा, एच.एन.पी.व्ही अशा जैविक किड नियंत्रणाचा वापर करावा.
काढणी :(Harvesting)
तूरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेढ्या झोडपून शेंगा आणि दाणे अलग करावे.
साठवण:(Storage)
साठवणीपूर्वी तूर धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोदट व ओलसर जागेत करु नये. शक्य असल्यास कडूलिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणीतील कीडीपासून सुरक्षित राहते.
हेही वाचा :
1)पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…