कृषी सल्ला

जाणून घ्या ; पीक कर्ज कसे घ्यायचे व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची संपूर्ण माहिती…

Learn; Complete information on how to take crop loan and required documents

सध्या खरीप (Kharif) हंगामाला सुरवात झाली आहे, सगळीकडे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. अश्या वेळी शेतकऱ्यांना ( farmers) पीक कर्जाची (Crop loans) गरज लागत असते, आपण त्यामुळे पीककर्जसाठी कोणत्या कागदपत्रांची (documents) आवश्यकता आहे, पीककर्ज घेण्यासाठी काय करावे लागते या सर्वांची माहिती घेऊ.

राज्यामध्ये नुकतेच, पीक कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, केंद्रासरकाने देखील पीक कर्जाममध्ये यावर्षी बदल केल आहे. दर वर्षी पीककर्जावर सात टक्के इतका व्याजदर होता मात्र, यावर्षी तो व्याजदार चार टक्के इतका करण्यात आला आहे.

हेही वाचा : )घर बसल्या डिजिटल 8अ कसा काढाल? चला पटापट जाणून घ्या संपूर्ण माहिती, ज्यामुळे वाचेल तुमचा वेळ आणि पैसा…

[metaslider id=4085 cssclass=””]

पीककर्जसाठी लागणारी कागदपत्रे :
7/12 उतारा

8 अ

नकाशा

आधार कार्ड प्रत

३ फोटो

स्टॅम्प

१.६० लाखांपेक्षा जास्त पीककर्जासाठी

7/12 उतारा

8 अ

नकाशा आणि चतुर्सीमा

फेरफार

मूल्यांकन पत्र

सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त कागदपत्रे

आधार कार्ड प्रत

३ फोटो

हेही वाचा : Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…

पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी –

7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत देखील चालेल)

आधार कार्ड प्रत

नवीनीकरण अर्ज (बँक शाखेतून मिळेल)

पीकविमा काढण्याचा अर्ज, पण पीकविमा हा ऐच्छिक आहे.

यासाठी तुमचे खाते सेवा सहकारी बँक (Seva Sahakari Bank) आणि राष्ट्रीयकृत बँकेत (In a nationalized bank) असणे आवश्यक आहे.तरी ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे, कर्जा वरील परतफेड १२ केली जाते, 12 महिन्यांच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात सूट दिली जाते, तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते.

हेही वाचा :

1)महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…

2)मान्सूनपूर्वी लहान मुलांना द्या ‘हे’ लसीकरण; पीडियाट्रिक टास्कफोर्सने दिला सल्ला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button