महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी शेवग्याची लागवड केली जाते, काही शेतकऱ्यांना शेवगा लागवड करण्यास उत्सुक असतात परंतु सविस्तर माहिती अभावी ते लागवड करू शकत नाहीत चला जाणून घेऊया शेवगा (drumstick ) लागवड विषयी संपूर्ण माहिती.
कोरडवाहू ( Drought) जमिनीमध्ये शेवग्याची लागवड केल्यास शेतकरी बांधवांसाठी एक प्रकारचे वरदान ठरते. शेवगा पिक कोणतेही जमिनी उत्तम येते म्हणजेच हलक्या प्रतीची जमीन असेल तरीही चालू शकते. तसेच इतर पिकांच्या तुलनेत शेवगा लागवड करण्यासाठी कमी पाणी आवश्यक असते.
शेवगा लागवडीची वेळ( drumstick Planting time)
शेवगा पिकाची लागवड जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, या वेळी हवेतील आर्द्रता (Humidity) वाढते या कालखंडात उन्हाची तीव्रता देखील कमी असते.
शेवगा लागवडीचे व्यवस्थापन (Cultivation management)
शेवगा लागवड करताना पाऊस पडण्या अगोदर नियोजित जागेवर ४५x४५x४५ सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. त्यात एक घमेले शेणखत, २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५०० ग्रॅम निंबोळी खत व १० ग्रॅम दाणेदार कीटकनाशक मातीत चांगले मिसळून खड्डा भरुन घ्यावा.
हलक्या, मुरमाड जमिनीत लागवडीसाठी दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ मी x २.५मी (प्रतिहेक्टरी ६४० रोपे ) व मध्यम जमिनीसाठी ३ x३ मी ( प्रतिहेक्टरी ४४४ रोपे) अंतर ठेवावे.
तुम्हाला ठाऊक आहे का, धुळवाफ पेरणी कधी व कुठे केली जाते? जाणून घ्या ‘धुळवाफ पेरणी’ बद्दल सर्व काही…
शेवग्याच्या सुधारीत जाती (Improved breeds)
राज्यामध्ये पी.के.एम-१ (कोईमतूर-१), पी.के.एम -२ (कोईमतूर-२), कोकण रुचिरा, भाग्या (के.डी.एम-०१), ओडीसी इ. जातींची लागवड होते. त्यातील भाग्या ही कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाने बारमाही उत्पादनासाठी विकसित केलेली जात आहे.
शेवग्यासाठी खत व्यवस्थापन (Fertilizer management for sugarcane) शेवगा पिक वेगाने वाढणारे पिक आहे. म्हणून, पावसाच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात प्रत्येक झाडाला 10 कि. कंपोस्ट/शेणखत, 75 ग्रॅम नत्र (165 ग्रॅम युरिया) 50 ग्रॅम स्फुरद (108 ग्रॅम डी.ए.पी.) व 75 ग्रॅम पालाश (120 ग्रॅम एम.ओ.पी.) द्यावे.
‘मखाना शेती’ म्हणजे काय व शेतीतून किती उत्पन्न मिळते; जाणून घ्या सविस्तर माहिती…
काढणी (Harvesting) शेवगा पीक लागवड केल्यानंतर सहा महिन्यांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते, सर्वसाधारणपणे एका झाडापासून पन्नास किलोपर्यंत शेंगा मिळू शकतात.
शेवग्याच्या लागवडीकरिता मिळणारे अनुदान
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी(Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड (Tree planting) करण्याकरिता अनुदान मिळू शकते. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयात (In the Agriculture Office) जाऊन संपर्क साधावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा: