वांगी (Brinjal ) या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप,(Kharif) रब्बी आणि उन्हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक (Mixed crop) म्हणूनही वांग्याची लागवड करतात. आहारात वांग्याचा भाजी, भरीत, वांग्याची भजी, इत्यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे अ ब क ही जीवनसत्वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात (In Maharashtra) या पिकाखाली अंदाजे 28,113 हेक्टरी क्षेत्र लागवडीखाली आहे.
जमीन (Land)
सर्व प्रकारच्या हालक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पिक घेता येते परंतू सुपिक चांगला पाण्याचा निचरा होणा-या मध्यम काळया जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्यास पिकाची वाढ चांगली होते.
हेही वाचा : सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…
पूर्वमशागत
मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे.
लागवड(Planting)
वांग्याची लागवड तिनही हंगामात करता येते.खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्टमध्ये केली जाते.
वांग्याची रोपे गादीवाफयावर तयार करतात. गादीवाफे 3 बाय 1 मिटर आकाराचे आणि 10 ते 15 सेमी उंचीचे करावेत. वांग्यांच्या एक हेक्टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत.
गादी वाफयावरील रोपे 12 ते 15 सेंटीमिटर उंचीची झाल्यावर म्हणजे 6 ते 8 पानांवर आल्यावर लावणीस तयार होतात. बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीसाठी तयार होतात.काळया कसदार जमिनीत 100 बाय 100 सेंटीमीटर मध्यम प्रतीच्या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर आणि हलक्या जमिनीत 60 बाय 60 किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवावे.
हेही वाचा : सांगली जिल्ह्यातील बलवाडी गावाने कमवले “अश्या” पद्धतीने ऊसा पेक्षाही अधिक उत्पन्न! वाचा व ऐका सविस्तर बातमी…
पाणी व्यवस्थापन:(Water management:)
पाण्याच्या पाळया जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतात. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्या अंतराने हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळयात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात.
खत व्यवस्थापन:(Fertilizer management:)
हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फूरद आणि पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावे. आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ही खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडाच्या बुध्याभोवती 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बांगडी पध्दतीने द्यावीत. वांग्याच्या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फूरद द्यावे.
हेही वाचा :
सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे
कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!