महाराष्ट्रात गाजराची (Of carrots) लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील (Rabbi season) गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. रब्बी हंगामातील लागवड ऑगस्ट ते डिसेबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्यात करतात.
लागवड पध्दती (Cultivation methods)
गाजराच्या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्यावी. जमिन सपाट करुन घ्यावी. बी सरीवरंब्यावर पेरावी. दोन वरंब्यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे. एक हेक्टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजत ठेवल्यास हा काळ कमी करता येतो.
खते आणि पाणी व्यवस्थापन (Fertilizer and water management)
गाजराच्या पिकाला दर हेक्टरी 80 किलो नत्र 60 किलो स्फूरद आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लोगवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार 20 ते 30 गाडया शेणखत जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी मिसळून द्यावे.
बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमिन तयार झाल्यावर वाफे आधी ओलावून घ्यावेत आणि वाफसा आल्यावर बी पेरावे. पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या 50 दिवसाच्या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते. पाण्याचे प्रमाण जास्त झााले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्त होते.
कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण (Pest diseases and their control)
गाजराच्या पिकावर साडया भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रूटफलाय या किडीचा उपद्रव होतो. सोंडया भुंगा आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रूटफलाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्या ते काळसर रंगाची असते. या किडिच्या अळया पिवळसर पांढ-या रंगाच्या असून त्या गाजराची मुळे पोखरुन आत शिरतात आणि आतील भाग खात त्यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 3 मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे. गाजराच्या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्यादी रोंगाची लागण होते.
हे ही वाचा :
1)‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…
2)Investment Tips : दररोज शंभर रुपये बचत करा आणि पोस्टाचे योजनेतून 10 लाख रुपये मिळवा…