कृषी सल्ला

कृषि सल्ला विषयक माहिती जाणून घ्या सविस्तरपणे..

शेतकऱ्यांचा फळ शेती व्यवसायाकडे भर मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात अनेक भागात फळ शेती केली जाते. योग्य नियोजन पद्धतीने फळ शेती केली तर चांगले उत्पन्न काढले जाते. फळ पीक शेतीविषयक घ्यावयाची काळजी माहीत असणे गरजेचे आहे. रोगांचे किटकांचे नियंत्रण कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती घेवूया…

वाचा –

फळमाशी कीड –

फळ पिकावर उदा. आंबा, सीताफळ, टरबूज, संत्रा, डाळिंब तसेच इतर पिकांवर फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. फळमाशी ही पिवळसर रंगाची असते. फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असतो. व पंख सरळ लांब असतात. ही फळमाशी ५ ते ६ मी. मी लांब असते. १०० ते १५० अंडे घालते. अंडी घातलेली ठिकाणे फळे सडतात. या अंड्यातून अळ्या बाहेर निघतात. या अळ्या फळांचे नुकसान करतात.

वाचा –

फळमाशी किडीचे व्यवस्थापन असे करा –

फळांची गळ होण्यामागे फळमाशी असते. फळमाशी फक्त ट्रॅप (गंध सापळे) द्वारेच रोकता येते. कोणत्याही औषधे फळांमुळे शक्य होत नाही. किडीचे व्यवस्थापन असे करा.
प्रती एकर 10 ते 12 फळमाशीचे रक्षक ट्रॅप सापळे पिकाच्या उंचीच्या प्रमाणे 4 ते 5 फूट अथवा झाडावर टांगून ठेवा. संत्रा, मोसंबी, बोर, केळी, चिकू, आंबा, पेरू, सीताफळ, कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी ही पिके घेत असाल तर आपल्या बागेत फळमाशीचे सापळे पहिल्याच पावसानंतर लगेच वापरा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button