कृषी बातम्या

डाळीं आणि ज्वारीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण; जाणून घ्या प्रतिक्विंटलमागे किती रुपयांनी घटले बाजार भाव…

Learn a large drop in the price of pulses, sorghum; How much did the market price fall per quintal?

सध्या बाजारामध्ये ज्वारी (Jwari) व डाळीची (Pulses) मागणीत (In demand) 50 ते 60 टक्के घट झाली असल्याने डाळीचे व ज्वारीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. अवकेच्या तुलनेत मागणी अत्यंत कमी असल्याने घाऊक बाजारात ज्वारीचे दर क्विंटलमागे ८००- १००० रुपये आणि तूर डाळ ४००-६०० रूपये, उडीद, मुग डाळ ५००-८०० रूपये, वाटाणा ५००- ८०० रुपयांनी उतरले आहेत.

मागणी अशीच कायम राहिल्यास, काही दिवसात अजून भाव खाली येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे संकट काही प्रमाणात ओसारले असून सध्या बाजारात चांगली आणि स्वच्छ ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणावर आहे.

हे ही वाचा: आशेचा किरण: आता, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार ‘अशा’ रीतीने करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार…

डाळींच्या किंमती कमी होण्याची कारणे : (Reasons for low prices of pulses)

केंद्र सरकारने (Central Government) डाळीचे आयात (Import) करण्यास परवानगी दिली असल्याने डाळींची आयात मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा परिणाम किमतीवर पाहण्यास मिळत आहे.

त्याचप्रमाणे केंद्र सरकारने (Central Government) डाळीच्या किमती स्थिर व्हाव्यात याकरिता स्टॉकवर (On stock) बंधने आणली आहेत, यामुळेदेखील डाळीचे किमतीचे बाजारभाव (Market price) कमी झाले आहे.

बाजारात मोठ्या प्रमाणावर माल शिल्लक आहे ; त्या तुलनेमध्ये ग्राहकांची मागणी (Demand) कमी आहे, म्हणजेच मालाला उठाव नाही याचा परिणाम देखील डाळींच्या किमती वर होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा:

1. अबब! ‘या’ देशातील लोकांना केळी खाण्यासाठी मोजावे लागतात 3300 रुपये! वाचा सविस्तर बातमी…

2. शेणाच्या बदल्यात मिळेल “गॅस सिलेंडर” वाचा कुठे राबवली जाते ही भन्नाट योजना

3. सर्व आजारांपासून बचाव करणारा, टोटल प्रोटेक्शन मास्क! वाचा काय आहे त्याची वैशिष्ट्ये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button