कृषी सल्ला

डाक विभागाकडून नवीन अँप लॉन्च; तुम्हाला गरजेची असलेली “ही” माहिती त्वरित मिळणार..

सर्व सामान्य लोकांसाठी तसेच सर्व ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई पोस्ट विभागाने लोकांच्या सोयीसाठी शनिवारी ‘नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप लाँच केले. याद्वारे तुम्ही घरबसल्या आपल्या परिसराच्या बीट पोस्टमनची सर्व माहिती मिळवू शकता. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..

वाचा

16 ऑक्टोबर पासून गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध –

राष्ट्रीय मेल दिवसानिमित्त लाँच करण्यात आलेले हे अ‍ॅप्लीकेशन डाक विभागाने एक क्रांती असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडेय यांनी सांगितले आहे की, मुंबईत डाक विभागाच्या इतिहासात हे पहिले अ‍ॅप्लीकेशन आहे, ज्याद्वारे लोक बीट पोस्टमनची सर्व माहिती सहज प्राप्त करू शकतात. हे अ‍ॅप्लीकेशन मुंबई पोस्टल विभागाद्वारे बनवण्यात आले आहे आणि 16 ऑक्टोबरपासून ते गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

वाचा

86 हजार ठिकाणांचा डाटाबेस

मुंबई एक मोठे क्षेत्र आहे. यासाठी अ‍ॅप्लीकेशनमध्ये 86 हजार ठिकाणांचा डाटाबेस आहे. लोक ठिकाण, पिनकोड किंवा पोस्ट ऑफिसचे नाव टाकून बीट पोस्टमनची माहिती मिळवू शकतात. अ‍ॅप्लीकेशनवर तुम्हाला ज्या पोस्टमनची माहिती मिळवायची आहे, त्याचे नाव, मोबाइल नंबर, फोटो आणि पोस्ट ऑफिसचे नाव तुमच्या मोबाइल स्क्रीनवर उपलब्ध होईल अशी माहिती दिलेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button