ताज्या बातम्या

Lunar Eclipse | आज रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, आज रात्री चंद्र बदलेल रंग! पाहायला चुकू नका हे दुर्मिळ चित्र..

Lunar Eclipse | Last lunar eclipse of the year tonight, the moon will change color tonight! Do not miss this rare picture..

Lunar Eclipse | आज रात्री, 28 ऑक्टोबर 2023 रोजी, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण आंशीक असेल, म्हणजेच चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या छायेखाली जाईल. हे ग्रहण (Lunar Eclipse) भारतातून पाहता येईल.

हे ग्रहण शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. शरद पौर्णिमाला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. हे ग्रहण विशेष ठरत आहे कारण ते भारतातून पाहता येईल.

चंद्रग्रहण पाहताना काय करावे आणि काय करू नये

चंद्रग्रहण हे एक खगोलीय घटना आहे. खगोलप्रेमींना याचे विशेष आकर्षण असते. हे ग्रहण आपल्याकडे दिसत असल्याने आज अनेकांनी ते पाहाण्याचा बेत आखला असेल. तुम्हालासुद्धा आजचं ग्रहण पाहायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा चंद्रग्रहण पाहाण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होऊ शकतो.

वाचा : Anganwadi Workers | मोठी बातमी ! अंगणवाडी सेविकांसाठी मोठा दिलासा! प्रमोशन, विमा, नवे फोन आणि बरंच काही …

  • ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ते पाहाण्यासाठी गॉगलचा वापर करावा.
  • ग्रहणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी हे आंशीक ग्रहण असणार आहे. हे ग्रहण कसे असते या बद्दल आधीच माहिती करून घ्यावी जेणे करून इतरांना तुम्ही त्याबद्दल सांगू शकाल.
  • ग्रहण पाहायला जाताना उबदार कपडे घाला, कारण आज शरद पौर्णिमा आहे. अनेक ठिकाणी थंडी पडायला सुरूवात झाली आहे. रात्री थंडीत बाहेर राहिल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
  • ही दुर्मिळ खगोलीय घटना पाहाण्याचा तुम्ही बेत आखला असेल तर, कदाचित तुम्हाला ग्रहणाची पुर्ण स्थिती पाहाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे शक्यतो जेवण करूनच गच्चीवर या. तसेच सोबत पाण्याची सोय ठेवा.
  • तुम्हाला जर ग्रहणाचे क्षण कॅमेरात टिपायचे असेल तर आधी तुमचा कॅमेरा किंवा स्मार्टफोन पुरेसा चार्ज करा. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोटो काढणे शक्य होईल.
  • फोटो काढण्याआधी तुमच्या कॅमेराची लेंन्स स्वच्छ करा. यामुळे ग्रहणाच्या फोटोची क्लियारिटी चांगली मिळेल. हे फोटो तुम्ही नंतर सोशल मीडीयावर शेअर करू शकता. तुमच्या फोटोचा दर्जा जर उत्तम असेल तर तुम्ही ते वेबसाईटवर विकूही शकता.

ग्रहणाची वेळ आणि स्थान

ग्रहणाची सुरुवात 28 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:31 वाजता झाली. ग्रहण पूर्णपणे झाले तेव्हा वेळ 02:23 वाजला. हे ग्रहण भारतातून पाहता येईल.

ग्रहणाचे परिणाम

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. काही ज्योतिषी मानतात की ग्रहणाच्या काळात काही वाईट परिणाम होतात. मात्र, आधुनिक विज्ञानात ग्रहणाच्या काळात कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत हे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा :

Web Title : Lunar Eclipse | Last lunar eclipse of the year tonight, the moon will change color tonight! Do not miss this rare picture..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button