Lasalgaon Market Committee | लासलगाव बाजार समिती 12 दिवस बंद; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, जाणून घ्या सविस्तर…
Lasalgaon Market Committee | Lasalgaon Market Committee closed for 12 days; Discontent among farmers, know in detail...
Lasalgaon Market Committee | लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील 12 दिवस बंद राहणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजपासून (7 नोव्हेंबर) ते 18 नोव्हेंबरपर्यंत ही (Lasalgaon Market Committee) बाजारपेठ बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दिवाळीसाठी शिल्लक कांदा विकून खर्च भागवावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आता ती आशाही फोल ठरताना दिसते आहे.
दीपावली सणानिमित्त कांदा विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने बाजार समिती बंद राहणार आहे. याबाबत पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला दिले.
वाचा : Birth and Death Registration | एक वर्षानंतरच्या जन्म-मृत्यू नोंदणीसाठी न्यायालयात जाण्याची गरज नाही, तहसीलदारांकडे अधिकार!
शेतकऱ्यांनी कांद्याचे भाव वाढावेत यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लासलगाव बाजार समिती बंदीमुळे होणारे परिणाम
- शेतकऱ्यांना कांद्याचे भाव मिळणे कठीण होईल.
- शेतकऱ्यांनी कांद्याचे भाव वाढावेत यासाठी आंदोलने करण्याची शक्यता आहे.
- बाजार समिती बंदीमुळे कामगारांना रोजगाराचा तोटा होईल.
- बाजार समिती बंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील आर्थिक घडामोडींना खीळ बसेल.
हेही वाचा :
Web Title : Lasalgaon Market Committee | Lasalgaon Market Committee closed for 12 days; Discontent among farmers, know in detail…