कृषी बातम्या

Land Purchase | गुंठेवारी जमिनी खरेदीसाठी स्थगिती; पहा सविस्तर बातमी…

Land Purchase | मागील काही वर्षांमध्ये जमिनीच्या (Land Rates) किमती प्रचंड वाढल्या आहेत . यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून गुंठेवारी जमीन विक्री केली जाते.तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून (Lifestyle) दस्तनोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार पुढे आल्यानंतर जमिनीच्या एक-दोन गुंठे खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली.

औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय –

गुंठेवारी खरेदी-विक्री करायची (Lifestyle) असल्यास संबंधित लेआऊट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने (Aurangabad Court) स्थगिती दिली होती. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार (Cash Transactions) नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक कर्जासाठी सातबारा असावा कोरा; ‘इतक्या’ कर्जाचा बोजा न चढविण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश…

पुढची तारीख 16 नोव्हेंबरला –

पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम ‘ब’ नुसार परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार एक-दोन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे लेआऊट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम (Lifestyle) प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्तनोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार असून, त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

होणार काय ?

एखाद्या सर्वेक्षण क्रमांकाचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्वेक्षण क्रमांकामधील एक, दोन किं वा तीन गुंठे जागा विकत घ्यायची असल्यास, त्याची दस्त नोंदणी होणार नाही. मात्र, त्याच सर्वेक्षण (Lifestyle) क्रमांकाचे रेखांकन (ले-आउट) करून त्यामध्ये एक, दोन गुंठय़ांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किं वा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास अशा मान्य रेखांकनामधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकेल, असे नोंदणी महानिरीक्षकांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button