कृषी बातम्या

Land Map Satbara | जमीन तुझी का माझी? एका झटक्यात लागणार निकाल, थेट सातबारा उताऱ्यावर ‘असा’ येणार जमीन मोजणी नकाशा

Land Map Satbara | सध्याच्या आधुनिक युगात सर्व काही डिजिटल झालं आहे. मनुष्य सर्व काही इंटरनेटच्या माध्यमातून सोपं करून पाहत आहे. कोणतीही माहिती एका चुटकीसरशी मिळणं सोपं झालं आहे. पूर्वी यासाठीच लोकांना प्रचंड खस्ता खाव्या लागत होत्या. ज्या आता एका क्लिकवर होत आहेत. अगदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह शेतीशी ही कागदपत्रे (Land Map Satbara) आता ऑनलाईन स्वरूपात मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही कार्यालयाच्या दहा खेट्या कराव्या लागत नाही. शेतकऱ्यांना आता डिजिटल सातबारा (Land Map Satbara) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

डिजिटल सातबारा | (Digital sign satbara)
जमिनीचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणजे सातबारा देखील ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या सातबारावर डिजिटल स्वाक्षरी (digital sign satbara)असते. या डिजिटल स्वाक्षरीमुळे सातबारा बनावट आहे की खरा हे समजते. आता शासनाने डिजिटल सातबाराच्या यशानंतर आणखी एक पाऊल उचलला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

डिजिटल नकाशे
जमिनीची मोजणी करताना जमिनीचे नकाशे (bhunaksha)फार महत्त्वाची कामगिरी करतात. आता ऑफलाइन पद्धतीने जमिनीचे नकाशे काढण्यात बराच वेळ जातो. तसेच फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. शासन डिजिटल सातबारा नंतर आता डिजिटल सातबाऱ्यावर डिजिटल नकाशे उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. या बाबतच्या हालचाली ही सुरू झाले आहेत.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

जमिनीचा निकाल लागणार झटक्यात
सातबारावर जमिनीचे नकाशे (bhunaksha) उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कळणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन किती व कोणती? हे एका झटक्यात ऑनलाइन माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे जमिनीबाबत असणारे वादही मिळणार आहेत. कदाचित सातबाऱ्यावर एक क्यूआर कोड देण्यात येईल याद्वारे शेतकरी आपल्या जमिनीचे नकाशे पाहू शकतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Is the land yours or mine? The results will be available in a flash, the land survey map will be directly on the Satbara passage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button