ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land Distribution Act | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! फक्त 100 रुपयांत होते जमिनीची वाटणी, त्वरित जाणून घ्या कशी?

Land Distribution Act | ज्याप्रमाणे भाव तिथे भावकी येते त्याचप्रमाणे आज ना उद्या जमिनीची वाटणी ही होतेच. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करताना अनेकदा या वाटणीमुळे बरेचसे वादही निर्माण होतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करताना त्या व्यक्तींना भरमसाठ पैसेही मोजावे लागतात. अनेकदा या पैशांमुळेच जमिनीची वाटणी (Land Distribution Act) करणं देखील राहून जातं. परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? की फक्त केवळ 100 रुपयांमध्ये जमिनीची वाटणी (Land Distribution Act) होऊ शकते. चला तर मग 100 रुपयांमध्ये जमिनीची वाटणी कशी होऊ शकते हे जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

केवळ 100 रुपयांत जमिनीचे वाटणीपत्र
वडिलोपार्जित जमिनीची वाटणी (Land Distribution Act) करण्यासाठी वाटणीपत्र करणं महत्त्वाचं असतं. या वाटणी पत्राशिवाय जमिनीची वाटणी करणे शक्य नसते. अनेकदा गावचे तलाठी जमिनीचे वाटणी करताना शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात. परंतु शासनाच्या नियमानुसार आणि कलमानुसार केवळ 100 रुपयांमध्ये जमिनीचे वाटणी पत्र तयार केले जाते.

कसे तयार केले जाते 100 रुपयांत वाटणीपत्र?
शेतकरी मित्रांनो संविधानातील कलम 85 अन्वये जमिनीचे वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी करण्यासाठी करण्यात येणारे वाटणी पत्र हे 100 रुपयांत केलं जातं. भाऊबंदकीच्या सहमतीने ही वाटणी करणे सोपं होतं. शांतपणे जमिनीची वाटणी करून घ्यायची असेल, तर या कलमाचा आधार घेऊन तसेच जास्त पैसे न खर्च करता यावर 100 रुपयांमध्ये जमिनीची वाटणीपत्र तयार होते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
शेतकरी मित्रांनो केवळ 100 रुपये मुद्रांक शुल्क असलेल्या दस्तावर ‘आपली वाटणीपत्र’ यावर तुम्ही वाटणी पत्र तयार करू शकता. शेतकऱ्यांनी या कलमाचा लाभ घेऊन याप्रमाणे जमिनीची वाटणी केली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांचे विनाकारण जाणारे 5 ते 10 हजार रुपये यामुळे वाचणार आहे.

Web Title: Important news for farmers! Allotment of land was done in just 100 rupees, how to know immediately?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button