राज्यभरात राबवणार कृषी संजीवनी योजना; शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करणार – कृषी मंत्री दादाजी भुसे…
Krishi Sanjeevani Yojana to be implemented across the state; Will try to bring modern technology to farmers' dams - Agriculture Minister Dadaji Bhuse
राज्यभरात मान्सून (Monsoon) पावसाने पाऊस आगमन केले असल्यामुळे, खरीप हंगाम यशस्वी करण्याकरिता कृषी विभागाकडून (From the Department of Agriculture) वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे याच पार्श्वभूमीवर कृषी संजीवनी मोहीम (Krishi Sanjeevani Mohim) राबवली जाणार आहे, या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचे काम कृषी विभाग करणार आहे,तसेच दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि. 1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा : सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!
कृषी संजीवनी ची मोहीम चालू झाली असून या मोहिमेच्या अंतर्गत,बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, (BBF planting technology) बीजप्रक्रीय, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कृषी संजीवनी मोहिमेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल, 24 जून रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बिया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान (Intercropping technology) याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : “या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…
25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (Under Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme) फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, 29 जूनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादक वाढीसाठी सहभाग, 30 जूनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रण उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाची सांगता एक जुलै रोजी करण्यात येणार आहे, कृषी संजीवनी मोहीम दरवर्षी एक जुलै रोजी चालू होतो परंतु सध्या खरीप हंगाम असल्याकारणाने कृषी संजीवनी मोहीम लवकर घेण्यात आली आहे, या मोहिमेचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल.
शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना, करा ‘या’ घटकाचा उपयोग उत्पादनात दहा टक्क्यापर्यंत होईल वाढ…