कृषी बातम्यायोजना

Plan| कोल्हापुर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी नवीन योजना: उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत आणि प्रदूषणमुक्त शेती|

Plan| कोल्हापूर, 3 जुलै 2024: कोल्हापूर जिल्हा कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगत (Advanced) आहे. जिल्ह्यात पश्चिम ते पूर्व आणि उत्तर ते दक्षिण असे विविध प्रकारचे पर्जन्यमान आणि हवामान आहे. पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त असते आणि पूर्वेकडे जाताना ते कमी होते. जिल्ह्यातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र उसाखाली आहे. उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अतिवापर करतात. यामुळे काही भागातील जमीन क्षार बनत आहे.

शाश्वत शेतीसाठी उपाययोजना:

उत्पादकता वाढवताना जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित (polluted) होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची तपासणी करून जमिनीच्या आरोग्य पत्रिकेत दिलेल्या शिफारसीनुसार रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.

वाचा:Free Treatment| महात्मा फुले जन आरोग्य योजना: आता पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही पाच लाखांपर्यंत मोफत उपचार|

उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत:

ऊसतोड झाल्यानंतर शिल्लक राहिलेला उसाचा पाला लोक जाळतात, ज्यामुळे हवा प्रदूषित (polluted) होते. उसाचे पाचट न जाळता ते कुजवून उत्तम सेंद्रिय खत बनवता येते. यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

तण नियंत्रण आणि हिरवळीची खते:

तण नियंत्रणासाठी आणि जमिनीची सुपीकता (Fertility) वाढवण्यासाठी शेतकरी हिरवळीची खते लावू शकतात. ताग किंवा धैंचा यांचा वापर केल्याने नत्र जमिनीमध्ये उपलब्ध होते. बायोगॅस युनिटमधून मिळणारी स्लरी हीदेखील पिकाला उपयुक्त आहे आणि ठिबक सिंचनाद्वारे दिली जाऊ शकते.

जिल्हा परिषदेची मदत:

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर पाचट कुट्टी मशीन / मल्चर / sugarcane thrash cutter ही नाविन्यपूर्ण योजना यावर्षी राबवण्यात येणार आहे.

इतर योजना:

  • 75 टक्के अनुदानात डी. एम. एस. स्वामीनाथन कृषी भू-संजीवनी योजनेतून ताग/धैंचाचे बियाणे पुरवून हिरवळीच्या खतांचा वापर वाढवणे.
  • 50 टक्के अनुदानावर गांडूळखत निर्मिती प्रकल्पातून गांडूळखत पुरवणे.
  • 50 टक्के अनुदानावर स्लरी फिल्टर युनिट, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप इत्यादी योजना.

शेतकऱ्यांना आवाहन:

शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घेऊन शाश्वत शेतीतून आपला विकास साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button