कृषी बातम्या

Agricultural Patterns | आता कोल्हापूर जिल्ह्याचा ‘हा’ शेती पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर, जाणून घ्या काय आहे हा पॅटर्न?

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतीतील (Agriculture) उत्पादन वाढीसाठी नेहमीच विविध योजना राबवल्या जातात.

Agriculture Pattern | शेतकऱ्यांना विविध योजनांच्या (Yojana) माध्यमातून अनुदान (Subsidy) दिले जाते. त्याचबरोबर अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना (Corona) काळात विधवा झालेल्या शेतकरी महिलांना पेरणीसाठी (Sowing) मोफत बियाणे (Free seeds) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आश्वासन कृषी मंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिले आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय आहे हा पॅटर्न?
कोल्हापूर जिल्ह्यामधील जिल्हा अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये पती गमावलेल्या शेतकरी महिलांसाठी एक योजना राबवली आहे. या महिलांना पेरणीसाठी बियाणे वाटप केले जाणार आहे. मोफत बियाणे वाटप करून या विधवा महिला शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हेतू आहे. तेथील महिलांना मोफत बियाणे दिल्यानंतर शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा आर्थिक खर्च कमी होईल. आता हाच पॅटर्न महाराष्ट्रभर राबविण्यासंदर्भात कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील असे आश्वासन दिले आहे.

वाचाCrop Insurance | खरीप पीक विम्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारं फायदा

वाचाCrop Insurance | महाराष्ट्रात पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल, नव्या पॅटर्नचा शेतकऱ्यांना होणार फायदा?

काय म्हणाले कृषी मंत्री?
कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठकीत बोलताना दादाजी भुसे म्हणाले की, “शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून गरज भासल्यास बफर स्टॉक मधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा, असे सांगून शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये, जेणेकरुन दुबार पेरणी करावी लागणार नाही,” असे आवाहन देखील त्यावेळी त्यांनी केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button