योजना

Crop Insurance| पीक विमा योजनेबाबत कृषी विभागाकडून महत्वाचा खुलासा|

Crop Insurance| कोल्हापूर: अलीकडे सोशल मीडियावर व्हॉट्सॲपद्वारे फिरणाऱ्या एका संदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या संदेशात (in the message) असे म्हटले होते की, पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि ७/१२ यावरील नाव पूर्णपणे सारखे असणे आवश्यक आहे. यात किरकोळ बदलही असल्यास विमा मिळणार नाही, असे या संदेशात म्हटले होते.

परंतु, कृषी विभागाने या संदेशाबाबत खुलासा करत शेतकऱ्यांना अनावश्यक गोंधळात न पडण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, आधार कार्ड आणि सातबारा उतारा यावरील नावात किरकोळ बदल असला तरीही पीक विमा अर्ज स्वीकारण्यात येतील.

वाचा::Onion Prices Unstable| सोयाबीन आणि कापसाच्या भावात घसरण, तुरी आणि हळदीला आधार, कांद्याचे भाव अस्थिर|

तथापि, पूर्ण नाव किंवा आडनाव (last name) वेगळे असल्यास विमा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये विमा कंपनीद्वारे नावातले बदल तपासले जातील आणि तपासणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

याशिवाय, शेतकऱ्यांनी *केवळ लागवड (Cultivation) केलेल्या पिकाचाच आणि त्याच क्षेत्राचा विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात न आढळल्यास विमा अर्ज नामंजूर केला जाईल. *ई-पीक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

कृषी विभागाने आतापर्यंत ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झाले आहेत. खरीप हंगामासाठी विमा घेण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित विमा उतरवून घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button