दिनंदीन बातम्या

Recruiting| कोल्हापूर: शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये ६,८३० कंत्राटी पदांसाठी भरती, विरोधकांकडून तीव्र टीका|

Recruiting| कोल्हापूर, 19 जुलै 2024: कत्राटी भरतीला होणाऱ्या तीव्र विरोधाला न जुमानता राज्य सरकारने पुन्हा नव्याने शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ६,८३० पदांसाठी कंत्राटी भरतीची घोषणा केली आहे. यात महाविद्यालय (College) आणि रुग्णालयात गट ‘क’ मधील १७३० आणि गट ‘ड’ मधील ५१०० पदे भरण्यात येणार आहेत. ही सर्व पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत.

खर्च कमी करण्याचा सरकारचा दावा

प्रशासनावरील होणारा खर्च कमी करून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यासाठी आवश्यक तिथे कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे शासनाचे धोरण आहे. गतवर्षीही (Last year too) अशीच भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र विरोधकांनी आणि तरुणांनी तीव्र विरोध केल्याने सरकारने ती रद्द केली होती. आता पुन्हा नव्याने या भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

या कंत्राटी पदे नियमितपणे भरली असती तर शासनाचा जितका खर्झा ला असता त्या खर्चाच्या २०-३० टक्के बचत होणे आवश्यक असल्याची अट संबंधित कंपन्यांना घातली आहे.

वाचा: Agricultural income| नाशिकमध्ये तुरीला १०,५०० रुपये प्रतिक्विटलचा दर! मका आणि ज्वारीचे दर स्थिर, बाजरीला भाव वाढ|

विरोधकांकडून तीव्र टीका

या भरतीला विरोधकांकडून तीव्र टीक होत आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनिल लव्हेकर यांनी म्हटले आहे की, या भरतीमुळे गोरगरीब (poor) गरजू आणि योग्य मुलांच्यावर अन्याय होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही भरती म्हणजे वशिलेबाजी आणि पैशाचा खेळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनीही या भरतीला विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या भरतीमुळे अस्थायी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगारावर काम करावे लागेल आणि कंपनी मालामाल होईल.

नऊ कंपन्यांद्वारे भरती

ही भरती नऊ कंपन्यांद्वारे हणार आहे. या कंपन्यांमध्ये काही आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मालकीच्या असल्याचा आरोपही होत आहे.

एक नियमित कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी

या भरतीमध्ये एका नियमित कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करणार आहेत आणि या कंपन्यांना त्या पगारातील कमिशन म्हणून तीस टक्के मिळणार आहेत. यावरून असे दिसते की कर्मचारी तुटपुंजा (meager) पगारावर राबणार आणि कंपनी मालामाल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button