कृषी बातम्या

Crop Insurance | ई-पीक पाहणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ! तात्काळ प्रक्रिया जाणून घेऊन सातबारा उताऱ्यावर करा पिकाची नोंद

Crop Insurance | यावर्षी राज्यात अतिवृषी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या शेती (Agriculture) पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक (Financial) मदतीकरता तब्बल 3 लाख 501 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आलीय. मात्र, या मदतीसाठी शेतकऱ्यांनी (Lifestyle) ई-पीक पाहणी प्रक्रिया करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ घेता येणार नाही. आता याच ई-पीक पाहणी प्रक्रियेला मुदत वाढ करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात ई-पीक पाहणीला (E pik Pahani) किती तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ही ई-पीक पाहणी प्रक्रिया कशी करावी.

वाचा :सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट! पीएम किसानचे 2 हजार ‘या’ तारखेपासून होणार जमा; कृषी मंत्रालयाने दिली माहिती

कधीपर्यंत करता येणार ई-पीक पाहणी?
शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी किंवा अतिवृष्टी भरपाई मिळवण्यासाठी असो ई-पीक पाहणी प्रक्रिया (Lifestyle) महत्वाची आहे. आता शेतकऱ्यांना 22 सप्टेंबर 2022 पर्यंत ही ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडून अतिवृष्टी भरपाईचा लाभ मिळविण्यासाठी त्वरित ही ई-पीक पाहणी प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

ई-पीक पाहणी प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद कशी करावी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ई-पीक पाहणी केली तरचं मिळणार पीक विमा! त्वरित जाणून घ्या सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद कशी करायची?

वाचा :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 5 वर्षानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

शेतकऱ्यांना किती मिळणार मदत?
शेतकऱ्यांना निकषानुसार जिरायत शेतीतील पिकाच्या (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: E-Peak inspection extended till ‘this’ date! Know the immediate process and record the crop on the seventh passage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button