व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…
Know the great opportunity the state government offers to do business; Where and how to apply
केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) कडून उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता स्टार्टअप (Startup) करण्यासाठी अनेक योजना (Plan) आखल्या आहेत. ज्या व्यक्तीकडे उद्योग क्षमता आहे, त्यासंबंधी कलाकौशल्य आहेत, व्यवहारात तरबेज आहे, ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे अशा व्यक्तींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) सध्या अर्ज मागवण्यात सुरुवात केली आहे.
हेही वाचा : महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण अवजारे मिळणार! – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती…
या सप्ताहामध्ये नवउद्योजकांना (To entrepreneurs) एक सुवर्ण संधी देऊन सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे, यातूनच नवीन व्यासपीठ तयार होऊन, नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना येऊ शकतात.
शिक्षण क्षेत्र, कला, कौशल्य विकास, आरोग्यसुविधा कृषी, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, जल आणि कचरा व्यवस्थापन, आद्यवत पायाभूत व्यवस्था, चलनवलन आधी शासन, अशा इतर क्षेत्रातील स्टार्टअप करू इच्छिणार्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
सहभागी झालेल्या स्टार्टअप पैकी काही म्हणजे शंभर स्टार्टअपची तज्ञ परीक्षकांकडून निवड करण्यात येणार आहे, या शंभर न उद्योजकांना एखादी विशिष्ट समस्या सोडवण्यास संदर्भातील नवीन कल्पना सादर करण्याची संधी मिळेल, यामध्ये शासकीय, औद्योगिक शैक्षणिक गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असेल. आठवडाभर चालणारे या कार्यक्रमाला सरकारी अधिकारी औद्योगिक विषय तज्ञ शैक्षणिक विशेष तज्ञ यांच्यासमोर आपले सादरीकरण (Presentation) करावे लागेल.
हेही वाचा : शेतीची कामे रॉबोटंच्या माध्यमातून होणार सोपी! कोणी बनवला हा रोबोट?
य शंभर स्टार्टअप पैकी 24 जनांना विजेते म्हणून निवड करण्यात येईल, व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कडून 15 लाखापर्यंतचे कार्यादेश प्राप्त होतील. यामुळे नवउद्योजकांना त्यांची उत्पादने किंवा सेवा प्रत्यक्षात देण्यासाठी शास्त्रीय यंत्रणेचा लाभ मिळेल त्याचप्रमाणे शासनाच्या संस्थात्मक विशेष विशेष मार्गदर्शन देखील मिळेल.
अर्ज कोठे कराल?
अर्ज करण्याकरता प्रथम तुम्हाला या खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
www.msins.in / Maharashtra State Innovation Society (msins.in)
हे अर्ज 12 मे 2021 ला सुरू झाले असून त्याची अंतिम तारीख 15 जून 2021 इतकी आहे. येथून निवडल्या जाणाऱ्या शंभर स्टार्टअप ची यादी जुलै 2021 मध्ये होईल. व अंतिम चोवीस देण्याची घोषणा 13 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात येईल.