Milk | देशी आणि विदेशी गाईच्या दुधात काय फरक असतो? जाणून घ्या सविस्तर…
Differince | गायीचं दूध हे लहान मुलांसाठी अतिशय फादेशीर असत. परंतु जस गोचिडाला दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाल आहे. गोड, व शरीरासाठी अतिशय उत्तम अस सोडून गोचीडाप्रमाणे तो अशुद्ध रक्ताचेच शोषण करू इच्छित आहे. मानवाची बदललेली ही विचारसरणीच मानवास घातक ठरत आहे. योग्य काय अयोग्य काय याचा विचारच देखील माणूस करत नाही. फक्त उत्पादन किती होते, नफा किती मिळतो याचाच विचार केला जात आहे. होणारे उत्पादन आरोग्यास उपयुक्त आहे का नाही याचा विचार देखील माणूस करत नाही.
भारतात गाईचे दूध, गोमूत्र, दही, तूप आणि शेण हे औषधी गुणांमुळे उपयुक्त आहेत. गाईचे तूप आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. गोमूत्र कीडनाशक म्हणून वापरले जाते. तसेच देशी गायीच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती असते. तसेच रोगांच्या प्रादुर्भावास हे दूध प्रतिबंध करते. पण भारतीयांना दूध कमी मिळते या कारणामुळे देशी गायींची कत्तल केली आणि विदेशी गायींचे वंश वाढवल जातात. वाढत्या महागाईत आता या गायींच्या संगोपनाचा खर्च परवडणारा नाही अस म्हटले जाते. दुधाच्या उत्पादनापेक्षा आरोग्यास उपयुक्त उत्पादने घेणे कधीही चांगले नाही का ?
वाचा: बाप रे! ‘या’ तीन पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, त्वरित जाणून घेऊन या पेयांचे सेवन थांबवा
देशी व विदेशी गायींच्या दुधातील फरक
तसं पाहिलं तर देशी गायीचे दूध आणि विदेशी गायींचे दूध यामध्ये मोठा फरक आहे. न्यूझीलंड आणि आफ्रिकेतील संशोधनानुसार विदेशी गायींच्या दुधाने क्षयरोग, हृदयरोग यासारखे विकार होतात. युरोपीयन गाईंच्या दुधात ए-1 बीटाकेसीन असते. त्याचे आतड्यांत पचन होऊन बीटा केझोमऑरफिन-7 हे पेप्टाइड तयार होते. हे पेप्टाइड रक्तात शोषले गेल्यास मधुमेह, हृदयरोग, स्वमग्नता आणि सिझोफेनियासारखे रोग माणसांना होतात. डॉ. कीथ वूडफोर्ड यांनी या बीटा केझोमॉरफिन-7 ला डेव्हिल इन द मिल्क असे म्हटले आहे. असे असेल तर दूध पवित्र आणि गोड कसे. हा मूलमंत्र युरोपियन गायींच्या दुधास लागू होत नाही.
वाचा: महोगनी झाड शेतकऱ्यांच्या फायद्याचं! मिळतोय तब्बल लाखोंचा नफा, जाणून घ्या सविस्तर माहिती
मग कोणत्या गायीचं दूध योग्य आहे?
तर विदेशात झालेल्या संशोधनानुसार देशी गायींचे दूध हे सुरक्षित दूध म्हटल गेल आहे. देशी गायींच्या दुधाची प्रत उत्कृष्ट आणि मानवी आहारास पोषक असल्याने त्याची तुलना संकरित गायीच्या दुधाशी होऊच शकत नाही. यासाठी देशी गायी किती महत्त्वाच्या आहेत याचा विचार करून देशी गायींचे संवर्धन करण्याचा विचार व्हायला हवा. सध्या भारतात गेली काही दशके विदेशी वळूचे वीर्य वापरून गोसंकर केला जात आहे. अशा संकरामुळेच भारतात क्षयप्रवण पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत आता नव्याने पाऊले उचलण्याची गरज आहे. देशी गायींच्या वंशाचे संवर्धन हे गरजेचे आहे. देशी गोवंश असणारे खिल्लार, डांगी, लाल कंधारी चोवीस तासात चार लिटर दूध देते. तर गवळाऊ आणि देवणी या गायी सहा लिटर दूध देतात. हे दूध पवित्र तर आहेच शिवाय शुद्धही आहे. तसेच संपूर्ण घराचे आरोग्य राखणारे आहे. देशी गायीचे गोमूत्र परिसर स्वच्छ ठेवते यामुळे घराचे आरोग्य उत्तम राहते. यासाठीच हवे देशी गायींचे संवर्धन होणे हे गरजेचं आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: