Pan Card | पॅन कार्ड हरवलंय? तर ‘अशा’ पद्धतीने त्वरित करा डाऊनलोड, जाणून घ्या प्रक्रिया
आधारकार्ड प्रमाणे पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट (Document)आहे. पॅन कार्ड (Pan Card) हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार (Financial Transactions) करण्यासाठीचे दस्तऐवज आहे.
Pan Card | हा दस्तऐवज आयकर विभागाने जारी केला आहे. पर्मनंट अकाउंट नंबर (Account Number) म्हणजेच पॅन हा दहा-अंक असलेला अल्फा-न्यूमेरिक युनिक आयडेंटिफायर (Alpha numeric unique identifier) आहे. तसेच, याचा वापर आयकर रिटर्न भरताना केला जातो.
पॅन कार्ड
कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज घेणे, मालमत्ता खरेदी करणे, बँक खाते उघडणे, दागिने खरेदी करणे, बँकेतून 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करणे, व्यावसायिक व्यवहारासाठी आणि आयकर संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड वापरले जाते. त्यामुळे पॅन कार्ड नसल्यास यांपैकी कोणतेही काम करणे शक्य नाही. पॅन कार्ड नंबरमध्ये व्यक्तीच्या टॅक्स आणि गुंतवणुकी संबंधित डेटा असतो. मात्र, पॅन कार्ड हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही e-PAN Card डाउनलोड करू शकता.
ई-पॅन डाउनलोड कसे करावे?
ई-पॅन सेवा त्या सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांना कायम खाते क्रमांक (पॅन) दिलेला नाही. मात्र, त्यांच्याकडे आधार आहे. ही एक प्री-लॉगिन सेवा आहे, जिथे तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता.यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या वेबसाईट लिंकवर क्लिक करून ‘ई-फायलिंग पोर्टल’ होमपेजवर जा, ‘तत्काळ ई-पॅन’ पर्यायावर वर क्लिक करा. यानंतर ई-पॅन ‘नवीन ई-पॅन मिळवा’ पर्यायावर क्लिक करा. तुमचा 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन कार्ड क्रमांक टाकून जन्मतारीख आणि कॅच कोड एंटर करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
वाचा: Yojana | तुमच्या खात्यात 342 रुपये आहेत ना? नाहीतर तब्बल 4 लाखांना मुकाल, जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल
ई-पॅन पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी…
नवीन ई-पॅन मिळवण्यासाठी तुमचा 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा चेकबॉक्स निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. यानंतर पुढे नवीन पेज ओपन होऊन OTP प्रमाणीकरण पृष्ठावर, आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी OTP प्रविष्ट करा. हा OTP फक्त 15 मिनिटांसाठी वैध असेल. योग्य OTP टाकण्यासाठी 3 प्रयत्न करावे लागतील. स्क्रीनवर दिलेला OTP एक्सपायरी काउंटडाउन वेळ तुम्हाला OTP कधी संपेल हे सांगते. आता Submit या पर्यायावर क्लिक करा. तुमचे ई-पॅन कार्ड PDF स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर, ई-पॅन त्वरित डाउनलोड करण्यासाठी ‘पीडीएफ डाउनलोड करा’ पर्यायावर क्लिक करा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: