ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Kisan Vikas Patra (KVP) Scheme | नादचखुळा! आता शेतकऱ्यांचे पैसे होणार दुप्पट; फक्त ‘या’ योजनेत काहीच महिन्यांसाठी करावी लागेल गुंतवणूक

Yojana | शेतकऱ्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra (KVP) Scheme) चालवते. या योजनेत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम दीर्घकालात दुप्पट करता येते. KVP योजनेचा कार्यकाळ 115 महिने म्हणजे 9 वर्षे आणि 5 महिने आहे. या योजनेत(Kisan Vikas Patra (KVP) Scheme) गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम रु 1,000 आहे, तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच शेतकरी त्यांच्या गरजेनुसार या योजनेत कितीही रक्कम गुंतवू शकतात..

वाचा : Google| बाप रे! तुम्हीही गुगलवर ‘या’ गोष्टी सर्च करताय? तर वेळीच व्हा सावध, नाहीतर भोगावा लागेल तुरुंगवास

किसान पत्र योजना(Kisan Vikas Patra (KVP) Scheme)
KVP योजनेचा व्याजदर वार्षिक 7.5 टक्के आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकरकमी 5000 रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम दुप्पट होते. म्हणजेच 10,000 रुपये. KVP मध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते.

अर्ज कसा करावा?
अर्जदारांनी प्रथम अर्ज प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म A जो पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून मिळवता येतो. पूर्ण भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सबमिट करा. तुम्ही एजंटमार्फत KVP मध्ये गुंतवणूक करत असाल, तर एजंटला फॉर्म A1 भरावा लागेल. तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता.

KVP मध्ये गुंतवणुकीचे काही फायदे

  • गुंतवणुकीची रक्कम दीर्घकालात दुप्पट होते.
  • व्याजदर स्थिर आहे.
  • सरकारची हमी आहे.
  • गुंतवणूक करणे सोपे आहे.
  • शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन बचत करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून शेतकरी त्यांचे आर्थिक स्थैर्य
  • वाढवू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Nadachkhula! Now farmers’ money will double; You have to invest in this scheme only for a few months

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button