
Loan | जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनले असेल, तर तुम्हाला सरकारकडून 3 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. कारण किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan Card Scheme) सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. शेतकऱ्यांना जेव्हा शेतीसाठी (Department of Agriculture) पैशांची गरज भासते तेव्हा त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना ( KCC Scheme ) चालवत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज (Low Interest Rate Loan) दिले जाते. कर्ज वेळेवर जमा केल्यावर 3 टक्क्यांपर्यंत व्याजदरात सूट दिली जाते.
वाचा: ब्रेकींग न्यूज! आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज
शेतीसाठी मिळतंय कर्ज
देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेत आहेत. या योजनेद्वारे 18 ते 75 वर्षे वयोगटातील प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज (Loan) दिले जाऊ शकते. या योजनेत खत-बियाणे, कृषी यंत्रे, मत्स्यपालन, पशुपालन यासह अनेक प्रकारच्या शेतीशी (Farming) संबंधित कामांसाठी कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज (Bank Loan) दिले जाते. कर्जाच्या रकमेवर कमाल 7 टक्के व्याजदर लागू आहे. कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास व्याजदरात 3% सूट दिली जाते.
वाचा: पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; नागरिकांसह राज्यांना दिले कोरोनासंदर्भात ‘हे’ महत्वाचे निर्देश
बिग ब्रेकिंग! कोरोनाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, राज्यात पुन्हा होणार मास्क सक्ती आणि कडक निर्बंध?
काय झाला फायदा?
केंद्र सरकारने सांगितले आहे की, आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून, भारत सरकारने मे 2020 मध्ये KCC योजनेअंतर्गत शेतकर्यांना 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कृषी आणि संलग्न क्रियाकलाप आणि सामान्य आर्थिक (Financial) क्रियाकलापांना चालना देण्यासाठी हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून वाचवण्यास मदत झाली आहे.
कर्ज अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्ड योजना आता पीएम किसान योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म पीएम किसान वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी अर्जदाराला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो व्यतिरिक्त शेतीची कागदपत्रे सादर करावी लागतात.
‘या’ बँकांमध्ये कर्ज आहे उपलब्ध
KCC द्वारे कर्ज मिळविण्यासाठी, अर्जदार SBI च्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकतो किंवा SBI शाखेतून फॉर्म घेऊ शकतो. विनंती केलेली माहिती भरल्यानंतर आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर, खाते उघडले जाते, ज्यामध्ये योजनेअंतर्गत कर्ज हस्तांतरित केले जाते. एचडीएफसी बँक आणि युनियन बँक किंवा फेडरल बँक देखील KCC योजनेअंतर्गत कर्ज देतात. अर्जदार शेतकऱ्याचा क्रेडिट स्कोअर, शेतीची कागदपत्रे, पीक उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न इत्यादी तपासल्यानंतरच एचडीएफसीसह इतर खाजगी क्षेत्रातील बँकांकडून अर्जदाराच्या खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- आंतरजातीय विवाह आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात कडक कारवाईची तयारी! शिंदे सरकारने उचललं मोठं पाऊल
- राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! शासनचं एका झटक्यात मिटवणार 50 वर्षांचा भाऊबंदकीच्या जमिनीचा वाद
Web Title:Good news for farmers! 3 lakh to be received under this scheme of the government, know in detail