MSP| शेतकऱ्यांसाठी खुशखबर, एनडीए सरकारने वाढवला हमीभाव, 14 पिकांच्या MSP ला मंजुरी
MSP| नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होण्याआधी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने खरीपच्या 14 पिकांच्या एमएसपीच्या दराला मंजुरी दिली आहे.
सरकारने धानाला 2,300 रुपये क्विंटल भाव देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे धानाची किंमत 170 रुपयांनी वाढणार आहे. तर कापसाच्या एमएसपीमध्ये 500 रुपयांची वाढ होणार आहे, यामुळे कापसाचे दर 7 हजार 521 रुपये आणि 7 हजार 121 रुपये होणार आहेत.
वाचा : Milk | दूध : फायदे अनेक, पण जास्त प्यायल्यास काय होते नुकसान?
या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ
ज्वारी: 3 हजार 371 रूपये
मूगः 8 हजार 682 रुपये
मकाः 2 हजार 225 रूपये
तूरः 7 हजार 550 रूपये
नाचणीः 4 हजार 90 रूपये
उडीदः 7 हजार 400 रूपये
बाजरीः 2 हजार 625 रूपये
सुर्यफूलः 7 हजार 280 रूपये
भूईमूगः 6 हजार 783 रूपये
सोयाबीनः 4 हजार 892 रूपये
याशिवाय देशात शेतमालासाठी 2 लाख टनाचं स्टोरेज तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.